निरा : आमदार संजय जगताप (MLA Sanjay Jagtap) यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पिंगोरी (ता.पुरंदर) येथील विकास सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली. आमदार जगताप यांनी नवनिर्वाचित उमेदवारांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पिंगोरी सोसायटीची निवडणूक अटीतटीची होईल, अशी अटकळ सर्वत्र बांधली जात होती. मात्र, अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी आमदार जगताप यांच्या मध्यस्थीनंतर ही निवडणूक बिनविरोध पार पडली. ११ जागांसाठी ही निवडणूक होणार होती. दोन्ही गटांनी एकत्र येत ही निवडणूक बिनविरोध केली. यामध्ये जुन्या गटाला सात, तर नवीन गटाला चार जागा मिळाल्या.
यामध्ये निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये मागील चेअरमन महादेव शिंदे यांच्यासह आप्पा सिताराम यादव, सिंधुताई चंद्रकांत ननावरे, भारती अरुण यादव, नानासाहेब पांडुरंग शिंदे, बबन एकनाथ शिंदे, कैलास निवृत्ती गायकवाड, राजेंद्र सुदाम शिंदे, कल्याण रामचंद्र धुमाळ, संतोष यादव, अजय भोसले यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच जीवन शिंदे, उपसरपंच प्रकाश शिंदे, पोलीस पाटील राहुल शिंदे यांनी या नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन केले.