PM नरेंद्र मोदींची उद्या मुंबईत सभा; अख्ख्या मुंबईतील १४ मार्ग नक्की का केलेत बंद?
विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून नरेंद्र मोदी यांची उद्या मुंबईत सभा होणार आहे. दादर शिवाजी पार्कमध्ये सभेच आयोजन करण्यात आलं आहे. मोदींच्या सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांनी वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. वाहनधारकांसाठी परिसरातील अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. वाहतूक पर्याची मार्गाने वळवण्यात आली असून वाहनधारकांनी सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
वेस्टर्न आणि इस्टर्न हायवेवरून वाहन सभेच्या ठिकाणी म्हणजेच शिवाजी पार्ककडे येण्याची शक्यता आहे. या वाहनांमुळे मुंबईकरांना त्रास होऊ नये, यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून रात्री १२ पर्यंत दादर आणि जवळपास परिसरातील १४ मार्गावरून होणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली असून पर्यायी मार्ग देखील उपलब्ध करून दिले आहेत.
या १४ मार्गांवर वाहतूक बंद
दादासाहेब रेगे मार्ग, शिवाजी पार्क दादर
लेप्टिनेंट दिलीप गुप्ते मार्ग, शिवाजी पार्क गेट नंबर – ४ शीतलादेवी रोड, शिवाजी पार्क
एलजे रोड : गडकरी जंक्शन, दादरहून शोभा हॉटेल, माहीमपर्यंत
एनसी केळकर रोड : हनुमान मंदिर जंक्शन ते गडकरी जंक्शन, शिवाजी पार्क, दादर
टीएच कटारिया रोड, गंगा विहार जंक्शन ते असावरी जंक्शन, माहीम पर्यंत
एस व्ही एस रोड , डॉ. बाबासाहेब आंबेडकर वरळीकर चौक (सेंच्युरी जंक्शन) ते हरिओम जंक्शनपर्यंत
हेही वाचा–Ajit Pawar News : स्वत:च्या हिमतीवर निवडणूक लढा; सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांना अक्षरश: झापलं
केळूस्कर रोड दक्षिण आणि केळुस्कर रोड उत्तर, शिवाजी पार्क, दादर.
एमबी राऊत मार्ग, शिवाजी पार्क दादर
पांडुरंग नाईक मार्ग(रोड क्रमांक ५) शिवाजी पार्क, दादर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, माहेश्वरी सर्कल ते कोहिनूर जंक्शन ,दादर
टिळक रोड , कोतवाल गार्डन सर्कल,दादर (पश्चिम) ते आरए किदवई रोड, माटुंगा (पूर्व)
खान अब्दुल गफ्फार खान रोड, सी लिंक रोड ते जेके कपूर चौकाहून माधव ठाकरे चौकापर्यंत
थडानी रोड, पोद्दार रुग्णालय जंक्शन ते बिंदु माधव ठाकरे चौकापर्यंत
डॉ. एनी बेसेंट रोड , पोद्दार रुग्णालय जंक्शन ते डॉ. नारायण जंक्शनपर्यंत
पर्यायी मार्ग कोणते?
एसव्हीएस रोडहून उत्तर दिशेकडे जाणाऱ्या वाहनांना सिद्धीविनायक जंक्शनहून एसके भोळे रोड-आगार बाजार, पुर्तगाल चर्च,डावा वळण्यावर गोखले, एसके भोळे रोडचा पर्याय असणार आहे.
एसव्हीएस रोडहून दक्षिणेकडे जाणाऱ्या दांडेकर चौकाहून डाव्या बाजूने पांडुरंग नाईक मार्ग, राजा बडे चौक, उजव्या वळणावरून एलजे रोडहून गोखले रोड किंवा एनसी केळकर रोडचा पर्याय उपलब्ध असणार आहे.