PM VIKAS Scheme: शिका मोफत, कमवा दरमहा! एकाच सरकारी योजनेतून मिळणार 5 योजनांचे फायदे

केंद्र सरकारची प्रधानमंत्री विरासत का संवर्धन म्हणजेच PM VIKAS योजना अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी राबवली जाते. या योजनेतून सीखो और कमाओ, उस्ताद, हमारी धरोहर, नई मंजिल आणि नई रोशनी या पाच योजनांचा लाभ मिळतो.
PM VIKAS Scheme
PM VIKAS Scheme (सौजन्य- सोशलमीडिया)
Published on: 
Updated on: 
  1. PM VIKAS योजनेतून 5 सरकारी योजनांचा लाभ

  2. मोफत कौशल्य प्रशिक्षणासोबत दरमहा स्टायपेंड

  3. पात्र लाभार्थ्यांना 1,000 ते 3,000 रुपये मासिक मदत

केंद्र सरकारची PM VIKAS म्हणजेच प्रधानमंत्री विरासत का संवर्धन ही योजना सध्या खूप चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे या एकाच योजनेतून सीखो और कमाओ, उस्ताद, हमारी धरोहर, नई मंजिल आणि नई रोशनी अशा 5 वेगवेगळ्या सरकारी योजनांचा फायदा मिळतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही योजना फक्त देशातील अल्पसंख्यांक लोकांसाठीच आहे. म्हणजेच तुम्ही मुस्लिम, शीख, जैन, ख्रिस्त किंवा पारसी असाल तरच तुम्हाला याचा फायदा घेता येईल. या योजनेतून केंद्र सरकार अल्पसंख्यांक लोकांचं आर्थिक आणि सामाजिक भलं करता येतं. देशभरातले बरेच लोक याचा फायदा घेतात. यात महिला आणि दिव्यांगांसाठी तर खास सोय आहे.

• या योजनेतून काय-काय मिळतं?

1. कामाचं ट्रेनिंग - या योजनेतून लोकांना कामाचं ट्रेनिंग मिळतं. जुनी, नष्ट होत चाललेली कला जपायला शिकवलं जातं.

2. बाजारपेठ मिळवून देणं - एवढंच नाही तर त्या कलांना बाजारपेठ मिळवून द्यायला पण सरकार मदत करतं.

3. महिलांसाठी खास ट्रेनिंग - अल्पसंख्यांक समाजातल्या महिलांना व्यवसायात पुढे जायला खास ट्रेनिंग दिलं जातं. यातल्या काही महिलांना 'उदयमी मित्र' म्हणून निवडलं जातं. या महिला दुसऱ्या महिलांना व्यवसाय शिकवतात.

4. अर्धवट शिक्षण पूर्ण करता येतं - ज्यांचं शिक्षण मधेच थांबलं, त्यांना या योजनेतून 12 वी पर्यंतचं शिक्षण घेता येतं.

PM VIKAS Scheme
PM Modi : हैदराबाद हाऊसमध्ये मोदी-टस्क भेट, व्यापार 6 वरून 10 अब्ज डॉलरवर नेणार; पोलंडच्या पंतप्रधानांचा महत्त्वाचा भारत दौरा

• महिन्याला किती पैसे मिळतात? स्टाईपेंड किती?

1. पारंपरिक कला शिकणाऱ्याला - पारंपरिक शिक्षण कौशल्य घेणाऱ्या माणसाला दर महिन्याला 3000 रुपये मिळतात.

2. आधुनिक काम शिकणाऱ्याला - आधुनिक कामांचं ट्रेनिंग घेणाऱ्या, पण बाहेरून येणाऱ्या माणसाला दर महिना 2000 रुपये, तर तिथेच राहून शिकणाऱ्याला महिना 1000 रुपये स्टाईपेंड मिळतो.

3. व्यवसाय ट्रेनिंग घेणाऱ्या महिलेला - व्यवसायाचं ट्रेनिंग घेणाऱ्या महिलेला रोज 200 रुपये मिळतात.

4. NIOS ब्रिज कोर्स करणाऱ्याला - NIOS ब्रिज कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्याला सहा महिन्यांसाठी महिना 1000 रुपये स्टाईपेंड मिळतो.

PM VIKAS Scheme
PM Kisan Yojana: 'पीएम किसान' लाभासाठी पायपीट, ई-केवायसी पूर्ण, अनुदान जमा होईना; वाशिम जिल्ह्यात सहाही तालुक्यांत नाराजी

• अर्ज कोण करू शकतो? पात्रता काय?

1. कोणते धर्म चालतात - यात मुस्लिम, शीख, जैन, ख्रिस्त किंवा पारसी या अल्पसंख्यांक धर्मांसोबत EWS प्रवर्गालाही अर्ज करता येतो.

2. EWS साठी जागा - अल्पसंख्यांक नसणाऱ्या पण EWS मध्ये येणाऱ्यांसाठी पारंपरिक ट्रेनिंगमध्ये 25% तर आधुनिक कामांच्या ट्रेनिंगमध्ये 15% जागा ठेवल्या आहेत.

3. वय किती हवं - कौशल्य ट्रेनिंग आणि शिक्षणासाठी वय 14 ते 45 वर्षे आहे. व्यवसाय ट्रेनिंगसाठी महिलांचं वय 18 ते 45 वर्षे असणं गरजेचं आहे.

4. पुरावा लागतो - ही योजना प्रामुख्याने अल्पसंख्यांकांसाठी असल्याने अर्ज करताना तुम्ही अल्पसंख्यांक असल्याचा पुरावा द्यावा लागतो. EWS मधून अर्ज करत असाल तर त्याचा पण पुरावा द्यावा लागतो.