औरंगाबाद : औरंगाबादून एक मोठी बातमी समोर येत आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी गंगापूर तालुक्यात सुरु असलेल्या एका जुगार अड्ड्यावर छापा मारला. यावेळी परिसरातली अनेक प्रतिष्ठीत लोक जुगार खेळताना आढळले. तर या कारवाई तब्बल पावणेदोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
[read_also content=”उत्तर कोरियाचं मिसाईल जपानमध्ये; लोकांमध्ये घबराट, रेल्वेसेवा बंद, अलर्ट जारी https://www.navarashtra.com/world/north-koreas-missile-in-japan-railway-service-closed-j-alert-issued-nrps-332553.html”]
गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव हद्दीत जुगार अड्डा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत जिल्ह्यातील मोठ्या प्रतिष्ठीतांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना पोलिसांनी अटक केली असून तब्बल पावणेदोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये 25 लाख रोख रक्कम व 5 चार चाकी लक्झरी गाड्यांचा समावेश आहे. या कारवाई जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.