maharashtra police
मुंबई : पोलीस दलामध्ये (Police) काम करण्याची आवड असणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. राज्यात सात हजार पदांची पोलीस भरती (Maharashtra Police Recruitment) होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल (Police Constable Recruitment) पदासाठी एकाच वेळी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. लवकरच या भरती प्रक्रियेविषयीची माहिती समोर येणार आहे.
[read_also content=”राज्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांना मिळणार उत्तम सुविधा, एमटीडीसी आणि खासगी उद्योजकांमध्ये करार https://www.navarashtra.com/maharashtra/mtdc-signed-agreement-with-private-businessmen-nrsr-282001.html”]
सात हजार पदांच्या भरती प्रक्रियेनंतर दहा हजार पदांसाठीही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. गृह खात्याकडून याविषयी लवकरच माहिती देण्यात येणार आहे. पोलिसांचं बळ कमी आहे. त्यामुळं आम्ही मंत्रिमंडळासमोर पोलिसांची ५० हजार पदांची भरती करण्यासंदर्भात माहिती देऊ आणि त्यांसंदर्भात निर्णय घेऊ, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले होते.
कोरोनाचा फटका पोलीस भरती प्रक्रियेला बसल्याने आवश्यकता असताना राज्यात पोलीस कर्मचाऱ्यांची भरती होऊ शकली नाही. राज्याच्या लोकसंख्येचा विचार करता पोलीस बळाची खूप गरज आहे. राज्य सरकारने त्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.