वडगाव मावळ : मावळ तालुक्यात अवैध व्यवसाय विरोधात पुणे ग्रामीणचे पोलिस उपविभागीय अधिकारी सत्य साई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार मोहीम सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून कामशेत शहरात कारवाई करण्यात आली आहे.
अवैध गुटख्यावर धाड टाकून कारवाई
कामशेत बाजारपेठ परिसरातील काही दुकानात अवैध गुटख्यावर धाड टाकून कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या कारवाईत २ लाख ५३ हजार २४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी भरत चंपालाला जैन, घिसाराम सुखराज चौधरी महावीर सुखलाल जैन सर्व रा.रा.कामशेत बाजारपेठ ता. मावळ याला अटक करण्यात आली आहे
काही गोडाऊन व दुकानात अवैध गुटखा विक्रीचा गोरख धंदा
कामशेत बाजारपेठेत परिसरातील काही गोडाऊन व दुकानात हा अवैध गुटखा विक्रीचा गोरख धंदा गेले कित्येक दिवस सुरू होता. याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. १४ डिसेंबर २०२३ पुणे ग्रामीण सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलीस व कामशेत पोलिसांच्या पथकाने शिताफीने सापळा रचून
अवैध गुटख्याच्या मालावर ही कारवाई
दुकानात असलेल्या अवैध गुटख्याच्या मालावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदर कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अकीत गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घटटे, उपविभागीय पोलिस अधिकारी लोणावळा विभाग सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार सागर बनसोडे, पोलीस हवालदार बंटी कवडे, पोलीस नाईक मुलानी, आशिष झगडे यांच्या पथकाने केली.
Web Title: Police strike action in kamshet in maval a large stock of gutkha seized nryb