मुंबईतील यंत्रणा 'ॲलर्ट मोड'वर; सुरक्षा यंत्रणा सज्ज, सर्वतोपरी खबरदारी
अमरावती : नववर्षाच्या स्वागत करण्याची तयारी अनेकांनी करून ठेवली आहे. मात्र, नववर्षाचे स्वागत करणाऱ्यांनो जरा सावधान, शहरात विविध भागात एकूण 80 अधिकाऱ्यांसह 800 पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त त्या रात्री रस्त्यांवर राहणार आहे, अशी माहिती पोलिस विभागाकडून देण्यात आली आहे.
पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या नेत्तृत्वात तिन्ही पोलिस आयुक्त, पाच सहाय्यक पोलिस आयुक्त, 80 पोलिस अधिकारी आणि तब्बल 800 पोलिस रस्त्यावर उतरून नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात राहणार आहेत. शहरात नववर्षाचे उत्साहात स्वागत केला जाणार आहे. अशा स्थितीत काही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा शहरात खडा पहारा राहणार आहे.
शहरातील अकोला टी-पाइंट, यवतमाळ टी पाइंट, राजकमल चौक, राजापेठ चौक, बडनेरा नवी व जुनी वस्ती, नवाथेनगर, चित्रा चौक, पंचवटी चौक, वेलकम पाईन्ट, इतवारा बाजार, रहाटगाव, नादगाव पेठ, जुना बायपास अशा आदी ठिकाणी पोलिसांचे फिक्स पाइंट लावले जाणार आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांच्या तपासणी केली जाणार आहे.
ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम
नववर्षाच्या स्वागतावेळी मद्यप्राशन करून धिंगाणा घालतात. भरधाव वाहने चालवून अपघात घडवितात. अशा प्रसंगी सर्व सामान्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे यावर्षी पोलिसांनी मद्यपींवर विशेष लक्ष ठेऊन आहे. मद्यपींसाठी पोलिसांकडून ड्रन्क अॅन्ड ड्राईव्ह मोहीम राबविली जाणार आहे. ब्रिथ अॅनेलायझरद्वारे वाहनचालकांची तपासणी करून, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. जे मद्यप्राशन करून गोंधळ घालतील, अशांना कारागृहाची हवा खाली लागणार आहे.
महिला सुरक्षेला असणार प्राधान्य
नववर्षात तरुणाईच्या उत्साहाला उधाण येते. अशा स्थितीत अनेक तरुण हे तरुणींची छेडखाणी करतात. त्यांचा पाठलाग करून त्रास देतात. हे प्रकार टाळण्यासाठी पोलिसांची विविध पथके तयार राहणार आहे. दामिनी पथकही अशा टवाळखोरांवर लक्ष ठेऊन राहणार आहे.
स्टंटबाजीवर राहणार ‘वॉच’
नवर्षाच्या उत्साहात अनेक तरुण दुचाकी भरधाव चालवितात. अनेक जण स्टंटरायडिंग करून स्वतः सह इतरांच्या जीवाला धोका निर्माण करतात. त्यामुळे स्टंटबाजी करणाऱ्यांवरही पोलिसांचा वॉच राहणार आहे. पोलिसांची शहरात गस्त राहणार असून, या माध्यमातून स्टंटबाजी करणाऱ्यावर लक्ष राहणार आहे.