Buldhana: बुलढाण्यातील महिला उद्योजिकांसाठी आनंदाची बातमी; घरगुती उत्पादनांना मिळणार नवी ओळख, प्रतापराव जाधवांची मोठी घोषणा

Prataprao Jadhav on Women Small Business & Food Safety : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी महिला बचत गट व पथविक्रेत्यांना अन्न गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले.
Prataprao Jadhav on Women Small Business
Prataprao Jadhav on Women Small BusinessPrataprao Jadhav on Women Small Business
Published on: 
Updated on: 
  • शेगाव-शिर्डीत साकारणार आधुनिक फूड स्ट्रीट

  • महिला उद्योजिकांना व्यवसायवाढीची संधी

  • प्रतापराव जाधवांची दिली माहिती

बुलढाणा: महिला बचत गट, लघुउद्योजिका आणि पथविक्रेत्यांनी आपल्या अन्नाची गुणवत्ता, खाद्यव्यवसायात स्वच्छता आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. ग्राहकांचा विश्वास हीच कोणत्याही व्यवसायाची खरी ताकद असून, सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थांच्या माध्यमातून आपल्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळवून द्यावी, असे आवाहन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाच्या अनुषंगाने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या पश्चिम विभागाच्या सहकार्याने शेगाव येथे पथविक्रेते, महिला बचत गट आणि लघुउद्योजिकांसाठी प्रशिक्षण व जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी एफएसएसएएल पश्चिम विभागाच्या प्रादेशिक संचालिका प्रीती चौधरी, उपसंचालक वैद्यही काळझुणकार, सहायक संचालक ज्योती हरणे, तहसीलदार प्रज्ञा काकडे, शेगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, एफएसएसएएल चे अधिकारी व कर्मचारी, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी, लघुउद्योजिका आणि पथविक्रेते उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकास, रोजगार आणि सर्वसामान्यांच्या कल्याणाशी संबंधित उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Prataprao Jadhav on Women Small Business
Buldhana: आधी अवैध रेती उपसा थांबवा, बोटी बंद करा; खडकपूर्णा प्रकल्पात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा, प्रशासनाला थेट इशारा

महिला बचत गटांनी आपल्या उत्पादनांची गुणवत्ता, स्वच्छता आणि पॅकेजिंग सुधारण्यावर भर द्यावा. खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी सुरक्षित अन्न हाताळणीच्या नियमांचे पालन करावे तसेच आवश्यक नोंदणी व परवाने घ्यावेत. एफएसएसएएल च्या अधिकाऱ्यांनीही प्रशिक्षणानंतर या व्यावसायिकांना मार्गदर्शन व सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शेगाव येथे एक कोटींच्या निधीतून फूड स्ट्रीट

शेगावच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण माहिती देताना त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या '१०० फूड स्ट्रीट्स' उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील शेगाव आणि शिर्डी या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांची निवड करण्यात आली आहे.

या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी एक कोटी रुपयांच्या निधीतून आधुनिक, स्वच्छ आणि सुरक्षित 'हेल्दी अँड हायजिनिक फूड स्ट्रीट' विकसित करण्यास मंजुरी मिळाली आहे. या उपक्रमामुळे भाविकांना सुरक्षित खाद्यसुविधा उपलब्ध होण्यासोबतच स्थानिक विक्रेते, महिला उद्योजिका आणि छोट्या व्यावसायिकांच्या व्यवसायालाही चालना मिळणार आहे.

Prataprao Jadhav on Women Small Business
Khamgaon: कापूस उत्पादक शेतकरी संभ्रमात! CCI केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा कायम; खासगी व्यापाऱ्यांकडून ५० हजार क्विंटल खरेदी