वीज दर कमी नव्हे तर आणखी वाढणार, कंपन्यांकडून मुख्यमंत्र्यांची दिशाभूल; उद्योग संघटनांचा दावा
छत्रपती संभाजीनगर : महावितरणने ऑनलाईन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढवण्याच्या हेतूने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी ३१ मार्च २०२४ नंतर सलग तीनवेळा ऑनलाईन पध्दतीने वीजबिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीज ग्राहक पात्र ठरणार आहेत. १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत सलग तीन वा तीनपेक्षा अधिक वीजबिल भरून योजनेचे लाभ उपलब्ध करण्यात आली आहेत.
हेदेखील वाचा : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; ट्रॅक्टरला दुचाकीची जोरदार धडक, एकजण गंभीर
ही योजना महावितरणच्या अशा लघुदाब चालू वीजग्राहकांसाठी लागू असेल, ज्यांनी १ एप्रिल २०२४ पूर्वी मागील एक वर्ष म्हणजे १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत एकदाही वीज देयकाचा भरणा केलेला नाही किंवा ऑनलाईन वीज देयक भरणा पर्याय वापरलेला नाही. ग्राहकांना लकी ड्रॉव्दारे स्मार्टफोन, स्मार्टवॉच अशी आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. ग्राहकांनी ऑनलाईन पध्दतीने वीज बिल भरून लकी डिजिटल ग्राहक योजनेचा लाभ घ्यावा, असे महावितरणचे आवाहन आहे.
ग्राहक रांगेत उभे राहण्यापेक्षा वेळ, श्रम व पैशांची बचत करत डिजिटल पध्दतीने वीज बिल भरणा करण्यास प्राधान्य देत आहेत. ग्राहकांना डिजिटल पध्दतीने वीज बिलाचा भरणा करता यावा, यासाठी महावितरणकडून संकेतस्थळ, महावितरण मोबाईल ॲपची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. ग्राहकांना देय रक्कमेवर ०.२५ टक्के डिजिटल वीज बिल भरणा सूट दिली जाते. परिणामी, सध्या राज्यात ७० टक्क्यांहून अधिक वीज ग्राहक ऑनलाईन पध्दतीने वीज बिलाचा भरणा करत आहेत. हे प्रमाण वाढविण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी लकी डिजिटल ग्राहक योजना राबविण्यात येत आहे.
महावितरण ड्रॉ ऑनलाईन पध्दतीने काढणार
महावितरणच्या प्रत्येक उपविभाग स्तरावर एप्रिल, मे व जून २०२५ या प्रत्येक महिन्यात एकप्रमाणे तीन लकी ड्रॉ ऑनलाईन पध्दतीने काढणार आहेत. प्रत्येक लकी ड्रॉमध्ये पाच विजेत्यांना स्मार्टफोन व स्मार्टवॉच ही बक्षिसे दिली जाणार आहेत. योजनेच्या कालावधीत ग्राहकाने नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, एनएसीएच, क्यूआर कोड, एनईएफटी, आरटीजीएस इ. ऑनलाईन वीजबिल भरणा पर्याय वापरून लकी ड्रॉ महिन्याच्या अगोदर दरमहा एकप्रमाणे सलग तीन किंवा तीनपेक्षा जास्त महिने वीजबिलरणे आहे.
हेदेखील वाचा : Jaipur-Ajmer Accident News: सीएनजी टँकरचा स्फोट; 6 जणांचा मृत्यू, 30 जण गंभीर जखमी