File Photo : Accident
पाचोड : बीडकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने भरधाव येणाऱ्या दुचाकीने महामार्गावरून वळण घेत असतांना ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. ही घटना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा फाट्यावर गुरूवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली.
हेदेखील वाचा : Jaipur-Ajmer Accident News: सीएनजी टँकरचा स्फोट; 6 जणांचा मृत्यू, 30 जण गंभीर जखमी
अशोक नाथा सावंत (वय ३०) असे गंभीर जखमीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अंबड तालुक्यातील वडीलासुरा येथील अशोक नाथा सावंत (वय ३०) हे पाचोड (ता. पैठण) येथे वायरमन आहेत. बुधवारी सकाळी आपली एचएफ डिलक्स दुचाकीवरून (एमएच २१ बीके ३९५१) कामावर येत असताना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा फाटा येथे ट्रॅक्टरने वळण घेत असताना दुचाकी ट्रॅक्टरच्या टॉलीला जाऊन धडकली.
जखमीला रुग्णवाहिकेतून केले रवाना
यामध्ये अशोक सावंत यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे. या अपघाताची माहिती स्थानिक नागरिकांनी तातडीने पाचोड पोलीस ठाण्यात कळविली. सहाय्यक पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे, बीट जमादार गोविंद राऊत, पोलीस नाईक गणेश रोकडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना भोकरवाडी येथील टोलनाक्यावरील रुग्णवाहिकेत तात्काळ पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम ठाकरे यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवले.
कारचे टायर फुटल्याने महिला जागीच ठार
कारचे टायर फुटल्याने एक महिला ठार तर अन्य एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक ४८० जवळ घडली. नेहा अनिल अंबरडेकर (२९) असे घटनेतील मयत महिलेचे नाव आहे. जयश्री अनिल अंबरडेकर या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहे तर अन्य चौघे हे या अपघातात किरकोळ जखमी झाले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अंबरडेकर कुटुंबीय हे समृद्धी महामार्गाने कारने (क्रमांक एम.एच.०४ सीएस ४४४२) शिर्डीकडे जात असताना अचानक गाडीचे टायर फुटले व गाडीचे नियंत्रण सुटून गाडी दुभाजकाला धडकून अपघात घडला.
हेदेखील वाचा : कल्याणीनगरमधील हॉटेलमध्ये चोरी करणारा अटकेत; दुचाकीसह तब्बल ‘इतक्या’ लाखांची रोकड जप्त