महापािलकेत मनसे विरुद्ध अायुक्त
पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणीपट्टी मीटरद्वारे आकारण्याचा प्रस्ताव लांबणीवर पडू शकतो. निवासी वापराच्या मिळकतींसाठी मीटरद्वारे पाणी पट्टी (बिल) आकारणीची प्रस्ताव गेल्या महिन्याभरापासून आयुक्त कार्यालयात पडून आहे. मीटरद्वारे पाणी बिलात वाढ होत असल्याच्या तक्रारी वाढत असल्याने आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी हा प्रस्ताव मंजूर होण्याची चिन्हे नाहीत.
शहरात सध्या समान पाणी पुरवठा (24 तास पाणी पुरवठा ) योजनेचे काम सुरु आहे. याअंतर्गत शहरात जलवाहिन्यांचे जाळे निर्माण केले जात आहे. तसेच नळजोडाला पाण्याची मीटर बसविण्याचे काम केले जात आहे. पाण्याची गळती रोखणे, पाण्याचा अपव्यय कमी करण्याच्या हेतूने पाणी मीटर लावले जात आहे. सध्या व्यावसायिक वापराच्या मिळकतींना पाण्याचे बिल हे मीटर पद्धतीने देण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वीचे मीटर बदलून त्या ठिकाणी एएमआर पद्धतीचे मीटर बसविले जात आहे. या मीटरद्वारे आकारली जाणारी पाणीपट्टी पूर्वीच्या तुलनेत जास्त येत असल्याने तक्रारीत वाढ झाली आहे.
निवासी वापराच्या ठिकाणी मीटरद्वारे पाण्याचे बिल देण्यास सुरुवात करावी, असा प्रस्ताव पाणी पुरवठा विभागाने महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासमोर ठेवला आहे. या प्रस्तावाला एक महिना झाला तरी मान्यता मिळालेली नाही, आता चार महिन्यात पालिका निवडणुका होणार असल्याने पाणी मीटरने बिल आकारण्याचा निर्णयाला या निवडणुकांचा अडथळा येणार असल्याची चर्चा महापालिकेत रंगली आहे.
चार महिन्यात घ्यावी लागणार निवडणूक
सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर राज्य सरकारला चार महिन्यात निवडणूक घ्यावी लागणार आहे. या निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. त्यात जर मीटरद्वारे पाण्याचे बील आकारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्यास याचा परिणाम मतदारांवर होण्याची शक्यता नाकरता येत नाही. तसेच ऐन निवडणूकीच्या तोंडावर हा निर्णय घेतल्यास राजकीय संतापाचा सामना हा सर्वच पक्षाच्या उमेदवारांना बसू शकतो. त्यामुळे या प्रस्तावावर तूर्तास तरी निर्णय होण्याची शक्यता नसल्याचे बोलले जात आहे.
विराेध करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा
तसेच विद्यमान आयुक्त डॉ. भोसले हे या महिनाखेर निवृत्त हाेत आहे. त्यामुळे ते देखील हा निर्णय घेण्याची शक्यता नाही. समान पाणी पुरवठा याेजनेतंर्गत सुमारे २ लाख ८० हजार इतके मीटर बसविले जाणार आहे. त्यापैकी १ लाख ८० हजार इतके मीटर बसविले गेले आहेत. तर काही ठिकाणी नागरिकांकडून मीटर बसविण्यास विराेध केला जात आहे. विराेध करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही पाणी पुरवठा विभागाने दिला आहे. पाणीपुरवठा विभागाचे १४१ स्वतंत्र विभाग असून, त्यापैकी ७२ विभागांत मीटर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.