गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास चोवीसच्यावर गावातील नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना नेहमीच आरोग्याशी - संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात जलवाहिनी तातडीच्या दुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर पाणी कपात आहे. त्यात, मंगळवारी स्टेम प्राधिकरणातर्फे शटडाऊन घेतल्यास पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
भीमाशंकर अभयारण्य आणि पश्चिम घाट परिसरात दमदार पावसाचा जोर कायम असून, २४ तासांत २३ मिमी आणि आतापर्यंत एकूण ३९८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. भीमा व आरळा नद्यांद्वारे दररोज सरासरी…
ठाणे शहरात पाण्याची टंचाई भासू लागल्यानंतर कळव्याचा पाणीसाठा ठाण्याला वळवण्यात आल्याने कळव्यात मोठ्या प्रमाणात पाणी कपात केली जात आहे. त्यामुळे कळव्यातील नागरिक आक्रमक झाले आहेत.
सध्या धरणाच्या उजव्या पायथ्याशी असलेल्या वीजगृहातून एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद १ हजार ५० क्युसेक पाणी पूर्वेकडे नदी पात्रात सोडण्यात येत आहे.
मागील काही दिवसांपासून निरा खोरे व भीमा खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नीरा नदीपात्रात वीर धरणामधून ६ हजार ५३७ क्युसेक इतका विसर्ग सुरु आहे.
अर्धा टीएमसी पाणीसाठा असलेल्या कास तलावाचे नयनरम्य सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. सातारा शहरासाठी तलावात दररोज दहा लाख लिटर पाणी उचलले जाते.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. काही ठिकाणी जास्त पाऊस झाला. त्यामुळे इतर धरणांची पाणी पातळी वाढली असली तरी वळवाच्या पावसानंतर वरुणराजाने विश्रांती घेतली.
ठाण्यात पाण्याची कमतरतेमुळे नागरिकांचे हाल होत आहे. हीच समस्या सोडवण्यासाठी जनसेवकाचा जनसंवाद' या उपक्रमात आमदार संजय केळकर यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना केल्या आहेत.
दहिवडी कुळकजाई हा रस्ता सिंदीखुर्द येथील ओढ्यावर पाणी असल्याने दिवसभर वाहतुकीसाठी बंद पडला होता. या रस्त्यावरील नवीन पुलाचे काम सुरू असून, तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी पूल केला होता.
शहरात सध्या समान पाणी पुरवठा (24 तास पाणी पुरवठा ) योजनेचे काम सुरु आहे. याअंतर्गत शहरात जलवाहिन्यांचे जाळे निर्माण केले जात आहे. तसेच नळजोडाला पाण्याची मीटर बसविण्याचे काम केले जात…
पाण्याची गळती कमी करून नागरिकांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याचे मोजमाप करणे आवश्यक आहे. त्यासाठी नळजोडास तातडीने एएमआर मीटर बसविणे जरुरीचे आहे.
गावातील विहिरींच्या पाण्याची पातळी खालावत जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.गावामध्ये जलजीवन मिशनचं काम सुरु आहे पण पाण्याचा मुख्य स्रोत नसल्यानं पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत.
महाराष्ट्रातील अनेक गावांना पाणीटंचाईचा सामाना करावा लागत आहे. अशातच आता कर्जत तालुक्यातील एका गावात नागरिकांना चक्क एक घोट पाणी मिळणं देखील कठीण झालं आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अधिक जलसाठा सिंचन प्रकल्पांमध्ये दिसत असला, तरी गेल्या महिनाभरात यात झपाट्याने घट झाल्याचे दिसून येत आहे. जत तालुक्यात पाण्यासाठी एकूण 27 प्रकल्प राबवले जात आहेत.