Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बार-पब मालकांनी ग्राहकांना दारू सर्व्ह करताना मर्यादा ठरवावी; पुणे पोर्शे कार अपघातप्रकरणी न्यायालयाचे स्पष्ट निर्देश

  • By युवराज भगत
Updated On: May 22, 2024 | 04:26 PM
Pune Sports Porsche Car Accident Case

Pune Sports Porsche Car Accident Case

Follow Us
Close
Follow Us:

Pune Porsche Accident Case : पुण्याच्या कल्याणीनगर भागात स्पोर्ट्स पोर्शे कार अपघातामध्ये निष्पाप तरुण-तरुणींचा जीव गेला होता. त्यानंतर या घटनेतील अल्पवयीन आरोपीची जामिनावर सुटका झाली होती. यामुळे या अपघाताला चांगलेच राजकीय वळण प्राप्त झाले होते. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आयुक्तालयाला भेट दिली होती. त्यानंतर आज कोर्टाने यावर स्पष्ट निर्देश दिले आहेत.

पुण्यातील कल्याणीनगर भागात स्पोर्ट्स पोर्शे कारचा 19 मे रोजी मोठा अपघात झाला होता. कल्याणीनगर भागात बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या 17 वर्षाच्या मुलाने स्पोर्ट कार पोर्शची दुचाकीस्वाराला धडक दिली. या घटनेच्या 15 तासांत काही अटी व शर्तींवर त्याला जामीन मिळाला होता. त्यानंतर या प्रकरणाला आक्रमक स्वरूप प्राप्त झाले. कारण यामध्ये दोन निष्पाप तरुण-तरुणींचा मृत्यू झाला होता.

पुणे न्यायालयाचे स्पष्ट निर्देश

महाराष्ट्रातील पुणे येथे पोर्श कार अपघात प्रकरणाने देश हादरला. ज्या पद्धतीने ही घटना घडली आणि नंतर अवघ्या काही तासांतच अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाला, त्यावरुन देशभरात संतापाची लाट उसळली. पोलिसांच्या सुरुवातीच्या तपासाने तर लोकांच्या मनातील शंकेला अजून बळ दिले. आता पुण्यातील स्थानिक न्यायालयाने याप्रकरणात निर्देश दिले आहे. पब आणि बार मालकांनी ग्राहकांना दारु सर्व्ह करण्याची, मद्य देण्याची मर्यादा निश्चित करावी, कारण लोकांना दारु पिल्यानंतर वाहन चालवत घरी पण जायचे असते, असे न्यायालयाने म्हटले आहे.
तिघांना पोलीस कोठडी
न्यायालयाने याप्रकरणात तीन आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारी पक्षाने आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची विनंती केली होती. आरोपींचे वय लक्षात येऊनही आरोपी बार मालकाने अल्पवयीन आरोपी, त्याच्या मित्रांना दारु विक्री केल्याचे म्हणणे सरकारी पक्षाने मांडले.
दोन तरुणांच्या मृत्यूबद्दल चिंता व्यक्त
न्यायाधीशांनी अपघातात दोन तरुणांच्या मृत्यूबद्दल चिंता व्यक्त केली. आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोक्षे यांच्यासमोर सरकारी पक्ष आणि आरोपींच्या वतीने युक्तीवाद करण्यात आला. न्यायाधीश पोक्षे यांनी सांगितले की, ज्या व्यक्तीने अधिक दारु पिली आहे, त्यांची पबमध्ये राहण्याची व्यवस्था व्हावी.

रस्त्यावरील लोकांचा यात काय दोष
रस्त्यावरील लोकांचा यात काय दोष? जे लोक पबमध्ये येतात. ते काही पायी घरी जात नाहीत. ते आपल्या वाहनातून घरी जातील. कुठे ना कुठे तरी बदल करावा लागेल. त्यामुळे पब आणि बार मालकांना त्यांना किती दारु द्यायची याची मर्यादा ठरवावी लागेल. न्यायालयाने बार आणि पब मालकांना लोकांना दारु सर्व्ह करण्याची मर्यादा ठरविण्यास सांगितल्याचे वृत्त आजतकने दिले आहे.
काय आहे प्रकरण
हिट अँड रनची ही घटना 19 मे रोजी घडली होती. कल्याणी नगरमध्ये हा अपघात घडला होता. बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या मुलाने हा अपघात केला होता. महागड्या पोर्श कारने दुचाकीवरील दोघांना चिरडले होते. दोन्ही अभियंते होते. प्रकरणात अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी पिझ्झा आणि बर्गर आणून दिले होते. कोर्टाने काही अटी-शर्तीवर त्याची 15 तासांच्या आत जामीनावर सूटका केली होती.

300 शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगितले
बाल न्याय मंडळाने आरोपीला 15 दिवसांपर्यंत ट्रॅफिक पोलिसांसोबत काम करण्याचे आणि रस्ते अपघातावरील प्रभावी तोडगा काय यावर 300 शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगितले होते. पोलीस तपासात आरोपी हा मद्याच्या अंमलाखाली होता आणि भरधाव कार चालवत असल्याचे निष्पन्न झाले होते.

 

Web Title: Pune courts clear instructions in case of pune porsche car accident bar pub owners should set alcohol serve limits to customers nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2024 | 04:25 PM

Topics:  

  • Porsche car accident

संबंधित बातम्या

Porsche Car Accident: पोर्शे अपघात प्रकरणातील ‘त्या’ दोन डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना रद्द करा, पोलिसांचे पत्र
1

Porsche Car Accident: पोर्शे अपघात प्रकरणातील ‘त्या’ दोन डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना रद्द करा, पोलिसांचे पत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.