पुण्यात गेल्या काही दिवसांपासू गुलियन बॅरी सिंड्रोमचे रूग्ण वाढत असून दिवसेंदिवस धोका वाढत चालला आहे. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोलापुरच्या तरूणाचा गुलियानब बॅरीमुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे. संबंधित तरूण पुण्यात सीएचं काम करत होता. प्रकृती खालावल्यामुळे तो मुळ गावी गेला होता. काल सायंकाळी त्याचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पुण्यात येथे गिलियन बॅरे सिंड्रोम ज्याला काही ठिकाणी गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) असेही म्हटलं जात आहे, या दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचे सहा नवीन संशयित रुग्ण आढळले आहेत. या प्रदेशातील एकूण रुग्णांची संख्या आता ७३ वर पोहोचली असून सध्या या रोगाने पुण्यात हाहाःकार माजवला असल्याचे दिसून येत आहे. इतकंच नाही तर दोन दिवसापूर्वी वेंटिलेटवर असणाऱ्या रुग्णांची संख्या 12 होती जी काल 14 वर पोहचली असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोग्य विभागाकडून आलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
Todays Gold Price: आनंदाची बातमी! सोन्या – चांदीच्या किमतीत मोठी घसरण, वाचा आजचे भाव
दरम्यान,पिंपरी-चिंचवड शहरातील एका ६४ वर्षीय महिलेचा गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजाराने बाधित होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या आजारानंतर त्या महिलेवर न्यूमोनियाचा प्रकोप झाला होता. महिलेला उपचारासाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महिलेचा मृत्यू न्यूमोनियामुळे झाल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.
“जीबीएसच्या एकूण रुग्णांची संख्या ७३ झाली आहे, ज्यामध्ये ४७ पुरुष आणि २६ महिलांचा समावेश आहे. यापैकी १४ जण व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत,” असे वृत्तसंस्था पीटीआयने राज्य आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले आहे. दरम्यान, या आठवड्याच्या सुरुवातीला २४ संशयित रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभागाने रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्याची चौकशी करण्यासाठी आपले प्रयत्न वाढवले आहेत आणि रॅपिड रिस्पॉन्स टीम (RRT) स्थापन केली आहे, जेणेकरून या आजारावर वेळीच नियंत्रण मिळवता येईल.
म्हाडाच्या तब्बल 2147 घरांसाठी लॉटरचा मुहूर्त ठरला; 5 फेब्रुवारीला काढली जाणार लॉटरी
WHO ने सांगितले आजाराबाबत
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, गुइलेन-बॅरे सिंड्रोम ही एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल स्थिती आहे ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती परिधीय मज्जासंस्थेच्या एका भागावर हल्ला करते. या सिंड्रोममध्ये, स्नायूंच्या हालचाली नियंत्रित करणाऱ्या आणि वेदना, तापमान आणि स्पर्श संवेदना वाहणाऱ्या नसा प्रभावित होतात, ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात, पाय आणि/किंवा हातांमध्ये संवेदना कमी होतात आणि गिळताना किंवा श्वास घेण्यास त्रास होतो
महामारी आहे का?
ही एक दुर्मिळ स्थिती आहे आणि जरी ती प्रौढ आणि पुरुषांमध्ये अधिक सामान्य असली तरी, सर्व वयोगटातील लोकांना याचा त्रास होऊ शकतो. अधिकाऱ्यांनी जनतेला माहिती दिली आहे की गुइलेन-बॅरे सिंड्रोम धोकादायक आहे, परंतु त्यामुळे महामारी किंवा जागतिक साथीचा रोग होऊ शकत नाही. हा आजार वेळीच उपाय करून बरा करता येतो. मात्र त्यावर वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे आणि योग्य ती यंत्रणा असणेही गरजेचे आहे