Dharashiv Dance Competition : पुण्यात धाराशिवच्या कलाकारांचा डंका! 'रस रंग' ग्रुपची गरब्यात बाजी

पुण्यात आयोजित अखिल भारतीय ‘नृत्य लास्य’ स्पर्धेत धाराशिवच्या श्रीयांनी डान्स स्टुडिओच्या ‘रस रंग’ ग्रुपने गुजराती गरब्यात प्रथम क्रमांक पटकावला. सुहासिनी कुलकर्णी यांच्यासह अनेक कलाकारांनी विविध पुरस्कार मिळविले.
Dharashiv Dance Competition : पुण्यात धाराशिवच्या कलाकारांचा डंका! 'रस रंग' ग्रुपची गरब्यात बाजी
Dharashiv Dance Competition : पुण्यात धाराशिवच्या कलाकारांचा डंका! 'रस रंग' ग्रुपची गरब्यात बाजीDharashiv Dance Competition : पुण्यात धाराशिवच्या कलाकारांचा डंका! 'रस रंग' ग्रुपची गरब्यात बाजी
Published on: 
Updated on: 
  • सुहासिनी कुलकर्णी यांना नृत्य सुजन पुरस्कार

  • नारायणी ग्रुपला तृतीय क्रमांक

  • कथकमध्ये अन्वी कुलकर्णी द्वितीय स्थानी

Dharashiv Dance Competition : पुणे येथे आयोजित अखिल भारतीय 'नृत्य लास्य' द्वितीय नृत्य स्पर्धेत धाराशिवच्या श्रीयांनी डान्स स्टुडिओमधील कलाकारांनी उल्लेखनीय यश संपादन केले. 16 ते 18 नोव्हेंबर 2026 या कालावधीत नाच फाउंडेशन व नटराज कला व सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

सुहासिनी कुलकर्णी यांना नृत्य सुजन पुरस्कार

या स्पर्धेत श्रीयांनी डान्स स्टुडिओच्या 'रस रंग' ग्रुपने गुजराती गरबा नृत्याचे उत्कृष्ट सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकावला. या ग्रुपचे नेतृत्व व मार्गदर्शन संस्थेच्या संचालिका सुहासिनी कुलकर्णी यांनी केले. तसेच त्यांनी वैयक्तिक सादरीकरणात राजस्थानी घूमर लोकनृत्य प्रकारात प्रथम क्रमांकाचा 'उत्कृष्ट कलाकार' पुरस्कार मिळविला. उत्कृष्ट शिक्षक म्हणून त्यांना 'नृत्य सुजन पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.

नारायणी ग्रुपला तृतीय क्रमांक

स्टुडिओच्या ज्युनिअर विभागातील 'नारायणी' ग्रुपने अर्धशास्त्रीय नृत्य प्रकारात तृतीय क्रमांक मिळविला. वैयक्तिक कथक नृत्य स्पर्धेत अन्वी कुलकर्णी हिने द्वितीय, तर सौम्या जाधव हिने तृतीय क्रमांक पटकावला.

याशिवाय विविध कला प्रकारांतील सादरीकरणासाठी अनुश्री बांगड, समृद्धी कपाळे आणि सूर्यादनी डिकले यांनी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. तर मृण्मयी कुलकर्णी, शिवांश कपाळे आणि अवनी चौधरी यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

धाराशिवच्या कलाकारांनी राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत मिळविलेल्या यशामुळे शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रात आनंद व्यक्त होत असून, सर्व यशस्वी कलाकारांचे अभिनंदन केले जात आहे.