'ऑक्टोबर हिट'चा तडाखा कमी होणार; राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज
हवामान विभागाने पावसाबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले की, पुणे घाटमाथ्यासह रायगड, पुणे, सातारा, बीड आणि जालना जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज आहे. दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्यात गुरुवारपासून काही ठिकाणी पावसासाठी पोषक स्थिती निर्माण होणार असल्याने उन्हाचा चटका काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. कोकणातील पालघर, मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामानाचा इशाराही देण्यात आला आहे. तर आज मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतही उष्ण व दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे.
Weather Update : राज्यातील तापमानात मोठी वाढ; रत्नागिरीत सर्वाधिक 39.2 अंश तापमान
राज्यातील तापमानात कधी वाढ तर कधी घट दिसून येत आहे. नैर्ऋत्य मॉन्सून परतल्यानंतर बहुतांश भागांत आकाश निरभ्र झाले असून, तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसा उन्हाचा चटका आणि उकाडा जाणवत आहे. पण, आता पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
पावसासाठी अनुकूल परिस्थिती होऊ शकते निर्माण
पुणे घाटमाथा, रायगड, पुणे, सातारा, बीड आणि जालना या जिल्ह्यांसह राज्यातील काही भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्यात गुरुवारपासून काही ठिकाणी पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे सध्या जाणवणाऱ्या उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
रत्नागिरीत सर्वाधिक तापमानाची नोंद
मागील २४ तासांत रत्नागिरी येथे सर्वाधिक ३९.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हरनाई येथे ३८.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. दुसरीकडे, जळगाव येथे राज्यातील नीचांकी १७.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.






