याशिवाय, गुजरात आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या बहुतेक भागांतूनही मान्सून परतला आहे. राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील उत्तर प्रदेशातील भागातून मान्सून माघार घेण्यास सुरुवात झाली.
भारतीय हवामान खात्याने दिल्लीतही पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. दिवसभर ढगाळ आकाश राहील आणि अधूनमधून सूर्यप्रकाश येईल. राजधानी दिल्लीत गडगडाटी वादळ आणि पाऊस पडू शकतो.
राज्यात गुरुवारपासून पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकणार असल्याने राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज आहे.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बाधित शेतपिकांचे तात्काळ पंचनामे करण्यात आले. बाधित पिकांचा अहवाल प्राप्त होताच राज्य सरकारने या मदतीच्या निधीस तत्काळ मंजुरी दिली.
शिरपूर येथील संपूर्ण रस्ते पाण्याखाली आले. नद्या-नालेदेखील तुडुंब वाहत होते. विजांचा कडकडाट देखील भय निर्माण करणारा होता. यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती. एक ते दीड तासात 75 मिमी पावसाची…
पावसामुळे वीज तारे तुटल्यास किवा वीज पुरवठा बाधित झाल्यास त्वरित कारवाई करण्यासाठी वीज विभागाला सतर्क ठेवण्यात आले आहे. तसेच, आरोग्य विभागालाही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
नवी दिल्ली येथील गंगा ऑडिटोरियम, इंदिरा पर्यावरण भवन येथे पार पडलेल्या समारंभात अमरावती महापालिका आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
पंजाबमध्ये धरणांची पाणी पातळी कमी झाली. परंतु, पावसाच्या इशाऱ्यामुळे चिंता वाढली. पंजाबमधील नद्यांची पाणी पातळी कमी झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे, परंतु 12 सप्टेंबरपर्यंत पावसाच्या इशाऱ्यामुळे चिंता वाढली आहे.
नांदेड आणि लातुरात जोरदार बॅटिंग केलेली असताना इतर जिल्ह्यात मात्र अत्यल्प पाऊस झाला. यात सर्वात कमी ५.४ मिमी संभाजीनगर जिल्ह्यात कोसळला. इतर जिल्ह्यातही पावसाची जेमतेम हजेरी राहिली.
पांडोह धरणाजवळील कात्री वळणाजवळ राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे कोसळला आहे. आता याठिकाणी पायी जाणेही कठीण बनले आहे. बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे महामार्गाचा मोठा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.
जम्मूमध्ये नद्यांच्या लाटेमुळे अनेक प्रमुख पूल, घरे आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांसह सार्वजनिक पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. सैन्यासह सर्व संस्था बचावकार्यात व्यस्त आहेत.
जिल्हा प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून पीडित शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करावे. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी आणि महसूल विभागाला दिले आहेत.
सध्या गगनबावडा परिसरात जोरदार पाऊस असल्याने तसेच पंचगंगा नदीला पूर आल्याने गगनबावडा कोल्हापूर वाहतूक मार्ग पूर्णता बंद झाला आहे .त्यामुळे रस्त्यावरून वाहतूक करणे सुद्धा धोकादायक बनले आहे.
प्रकल्पाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने बुधवारी बेंबळा आणि इसापूर २ मोठ्या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यात बेंबळा प्रकल्पाचे २ दरवाजे उघडले.
बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील सखल भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये नद्या वाहत आहेत. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे.