अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्याने आईनेच आपल्या १३ वर्षीय मुलाचा परकरच्या नाडीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना १४ नंबर येथे घडली. याप्रकरणी आईला नारायणगाव पोलिसांनी अटक केली आहे.
नारायणगाव : अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्याने आईनेच आपल्या १३ वर्षीय मुलाचा परकरच्या नाडीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना १४ नंबर येथे घडली. याप्रकरणी आईला नारायणगाव पोलिसांनी अटक केली आहे.
राज सचिन कदम (वय १३) असे खून झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे; तर विद्या सचिन कदम (३९, रा. सुवर्ण पॅलेस १४ नंबर, ता. जुन्नर) असे आरोपी आईचे नाव असून, पोलिसांनी तिला अटक केली आहे. विद्या कदम हिचे बोरी बुद्रुक येथील एका व्यक्तीशी अनैतिक संबंध होते. यामुळे तिचा नवरा सचिन कदम याने तिला २०१३ मध्ये सोडून दिले होते. त्यानंतर तो लोहगाव येथे राहत होता. तो त्याची दोन मुले वृषाली व राज यांना सासू-सासरे यांच्याकडून २०१७ मध्ये घेऊन आला. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात विद्या मुलांना कपडे घ्यायचे आहेत, असे सांगून घेऊन गेली. मात्र, ती परतील नाही.
२१ जानेवारीला चारच्या सुमारास विद्याने पती सचिन याला फोन करून राज याला अन्नातून विषबाधा झाली आहे, असे सांगितले. त्याला ससून रुग्णालयात भरती केले आहे सांगितले. मात्र, राज याचा २७ जानेवारीला मृत्यू झाला. मुलाचा अचानक मृत्यू झाल्याने सचिनला शंका आली. त्याने विद्याला भेटून काय झाले असे विचारले.
यानंतर तिने तिचे औटी नामक व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. तो तिला भेटण्यासाठी येत असे. मात्र, त्याचे येणे-जाणे राजला आवडत नसे त्यामुळे तिने राजला ठार मारण्याचा निर्णय घेतला. २० जानेवारीला पहाटे ४.३० च्या सुमारास राज झोपेतून लघवीसाठी उठला. त्याचवेळी विद्या हिने परकरची नाडी सोडून राज याचा गळा आवळला.
Web Title: Mother killed her child who was an obstacle to an immoral relationship incident in narayangaon pune nrka