Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजकीय अनधिकृत फ्लेक्सवर कारवाईचे महापालिका आयुक्तांनी दिले आदेश : १० हजार रुपयांच्या दंडासह गुन्हा दाखल होणार 

अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यांवर आता दंडासह गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याबाबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 08, 2025 | 09:52 PM
Municipal Commissioner orders action against unauthorized political flex: A case will be registered with a fine of Rs 10,000

Municipal Commissioner orders action against unauthorized political flex: A case will be registered with a fine of Rs 10,000

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : शहरात वाढत चाललेल्या अनधिकृत राजकीय फ्लेक्सच्या विळख्यातून पुणे महापालिकेने आता कडक भूमिका घेतली आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दोन दिवसांत तीव्र कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर प्रशासन सतर्क झाले असून, अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यांवर आता दंडासह गुन्हा दाखल होणार आहे.

हेही वाचा : IND vs SA T20I series : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चालणार अभिषेक शर्माची जादू! इतिहास घडवण्याची चालून आली नामी संधी….

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी शहरभर उभारलेले पोस्टर, बॅनर, शुभेच्छा फ्लेक्स, कार्यक्रम जाहिराती यांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याने नागरिकांकडूनही नाराजी व्यक्त केली जात होती.

महापालिकेने काही दिवसांपूर्वीच राजकीय पक्षांना आणि संभाव्य उमेदवारांना अनधिकृत फ्लेक्स लावू नयेत, तसेच आधी लावलेले फ्लेक्स तातडीने हटवावेत अशी विनंती केली होती. मात्र यानंतरही प्रत्यक्षात कोणतीही सुधारणा दिसून न आल्याने अखेर आयुक्तांनी कठोर निर्णय घेत कारवाईचे आदेश दिले. आयुक्तांनी स्पष्ट केले की, कोणत्याही प्रकारचा अनधिकृत फ्लेक्स, बॅनर किंवा होर्डिंग शहरात सहन केले जाणार नाही. राजकीय असो वा गैर-राजकीय, परवानगीशिवाय लावलेला कोणताही फ्लेक्स तत्काळ हटवला जाईल आणि संबंधित व्यक्तीविरुद्ध १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल.

याचबरोबर, अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे निवडणूक काळातील अवैध जाहिरातींवर मोठ्या प्रमाणात आळा बसेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. महापालिकेच्या आकाश चिन्ह विभागाच्या पथकांना, क्षेत्रीय कार्यालयांना आणि संबंधित विभागांना ४८ तासांत मोहीम राबवण्याचे आदेश देण्यात आले असून, शहरातील प्रमुख चौक, रस्ते, उड्डाणपूल, सार्वजनिक इमारती आणि खासगी जागांवरील अनधिकृत फ्लेक्स हटवण्याचे काम तातडीने सुरू होणार आहे.

दरम्यान, काही प्रभागांमध्ये मध्यरात्रीपासूनच अनधिकृत फ्लेक्स काढण्याचे काम सुरू करण्यात आल्याचे समजते. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात शुभेच्छा फ्लेक्स, जन्मदिवस पोस्टर्स आणि राजकीय बॅनर लावलेले आढळून आले. निवडणुकीचे वातावरण तापत असताना उमेदवारांकडून स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या जाहिरातींना उधाण येते. मात्र या गर्दीमुळे शहराचे सौंदर्य बिघडत असून, वाहतुकीतही अडथळे निर्माण होत असल्याचा अनुभव नागरिकाला दररोज येत आहे.

हेही वाचा : IND vs SA T20I series : अभिषेक शर्मासोबत सलामीला कोण उतरणार? कर्णधार सूर्याने थेट नावच सांगून टाकले….

महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जर राजकीय फ्लेक्स लावणारे स्वतःहून फ्लेक्स हटवतील तर दंडाची कारवाई टाळता येऊ शकते. पण फ्लेक्स जागेवर आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात कोणतीही सुट दिली जाणार नाही. काही पक्ष नेत्यांनी मात्र प्रशासनाच्या अचानक वाढलेल्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली असून, निवडणूक प्रचाराच्या तयारीला अडथळा आणल्याचा आरोप केला आहे. मात्र शहरातील शिस्त आणि सौंदर्य जपण्यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे प्रशासनाचे मत आहे.

निवडणुकीच्या दिशेने शहराची पावले वेगाने चालली असतानाच महापालिकेची ही अचानक कडक कारवाई राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. पुढील दोन दिवसांत शहरातील मोठा भाग अनधिकृत फ्लेक्सपासून मुक्त होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.

Web Title: Municipal commissioner orders action against unauthorized political flex

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 09:52 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.