अभिषेक शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
Abhishek Sharma to create history in T20 in 2025 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ९ डिसेंबरपासून ५ सामन्यांच्या टी २० मालिकेला सुरुवार होणार आहे. या मालिकेत भारतीय संघाचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा टी२० स्वरूपात इतिहास रचू शकतो. २०२५ हे वर्ष त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम वर्षांपैकी ठरले आहे. जिथे त्याने या स्वरूपात खोऱ्याने धावा काढल्या आहेत. त्याची आक्रमक फलंदाजी भारतीय संघासाठी एक मोठी बळकटी प्राप्त करून देतात. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत अभिषेक शर्मावर सर्वांच्या नजरा असणार आहेत.
हेही वाचा : Ashes मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या स्टार कॅप्टनचा मोठा निर्णय! रेड बॉल क्रिकेटला केला अलविदा
सध्या, २०२५ मध्ये टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पूर्ण सदस्य संघांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत झिम्बाब्वेचा ब्रायन बेनेट पहिल्या स्थानावर विराजमान आहे. या वर्षी त्याने २५ डावांमध्ये ९३६ धावा फटकावल्या आहेत. अभिषेक शर्मा या यादीत चौथ्या स्थानी असून त्याने २०२५ मध्ये आतापर्यंत १७ टी-२० सामन्यांमध्ये ७५६ धावा काढल्या आहेत. जर त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत आणखी १८१ धावा जोडल्या तर तो या वर्षी टी-२० सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बणी शकतो.
२०२५ मध्ये टी-२० सामन्यांमध्ये धावा करणाऱ्यांच्या बाबतीत बांगलादेशचा तन्झिद हसन दुसऱ्या स्थानी आहे. त्याने आतापर्यंत २७ सामन्यांमध्ये ७७५ धावा काढल्या आहेत. पाकिस्तानचा साहिबजादा फरहान २६ सामन्यांमध्ये ७७१ धावा करून यादीत तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. बांगलादेशचा अनुभवी फलंदाज लिटन दास देखील खोऱ्याने धावा काढत आहे. त्याने या वर्षी टी-२० सामन्यांमध्ये २५ सामन्यांमध्ये ६३५ धावा केल्या आहेत.
अभिषेक शर्माने आतापर्यंत भारतासाठी २९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले आहेत. त्याने ३७.४८ च्या सरासरीने १०१२ धावा फटकावल्या आहेत. त्याच्या फलंदाजीचा सर्वात वेगळा पैलू म्हणजे त्याची आक्रमक शैली, ज्याचा पुरावा १८९.५१ चा त्याचा प्रभावी स्ट्राईक रेट दाखवून देते.
या काळात अभिषेक शर्माने दोन शतके आणि सहा अर्धशतके झळकावली आहेत. आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या १३५ राहिली आहे.






