Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर ‘धूळ’धाण करणाऱ्यांवर कारवाई; PMC च्या नोटिसीकडे दुर्लक्ष अन् थेट 105 बांधकामे….

बांधकाम विभागाचे झोन एक ते झोन सहा असे विभाग आहेत. सर्व विभागांना आज सकाळी नियमांचे पालन न करणाऱ्या प्रकल्पांना थेट काम थांबविण्याची नोटीस देण्याचे आदेश दिले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 16, 2024 | 02:35 AM
अखेर 'धूळ'धाण करणाऱ्यांवर कारवाई; PMC च्या नोटिसीकडे दुर्लक्ष अन् थेट 105 बांधकामे....

अखेर 'धूळ'धाण करणाऱ्यांवर कारवाई; PMC च्या नोटिसीकडे दुर्लक्ष अन् थेट 105 बांधकामे....

Follow Us
Follow Us:
पुणे:  बांधकामाच्या ठिकाणी हाेणारे वायुप्रदुषण राेखण्यासंदर्भात महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन न करणारी १०५ बांधकामे थांबविण्याचा (वर्क स्टाॅप ) आदेश महापािलकेने दिले गेले आहेत. तसेच ६७ बांधकामांना पुर्वसुचना नाेटीस देण्यात आली आहे. शहरात सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी वारंवार सूचना देऊनही महापालिकेच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. १०५ बांधकामांचे कामच थांबविण्याचे आदेश देण्या आले आहे. महापालिकेच्या या कारवाईमुळे बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
बांधकामामुळे हाेणाऱ्या  प्रदुषणामुळे आरोग्यास हानीकारक असलेल्या पीएम 2.5 धूळीकणांचे प्रमाण वाढले आहे. हे धुलीकणाचे प्रदुषण कमी करण्यासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाने सर्व बांधकाम व्यावसाियक, अार्किटेक्ट, बांधकाम राडाराेडा वाहतुक करणारे अादींना ई मेल द्वारे प्रदुषण कमी करण्यासंदर्भात महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नियमावलीचे पालन करावे अशा सुचना िदल्या अाहेत, तसेच उपाय याेजना करण्यासाठी अाठ दिवसांची मुदत िदली अाहे.

यापुर्वी नाेटीस देण्यात अालेल्यांना अाता काम थांबविण्याचे अादेश देण्यास सुरुवात केली अाहे.  बांधकाम विभागातील अभियंत्यांनी झोन एक ते झोन सहामध्ये सर्वेक्षण करून ज्या ठिकाणी धूळ रोखण्यासाठी उपाययोजना केली नाही, अशा बांधकाम प्रकल्पांना नोटिसा बजावण्यात येत अाहेत.  यामध्ये काम थांबविण्याच्या सर्वाधिक नोटिसा या झोन सहामधील लोहगाव, हडपसर, केशवनगर, उंड्री, पिसोळी या भागातील बांधकामांना देण्यात आलेल्या आहेत.

झोन पाचमध्ये एकही काम थांबविले नाही
बांधकाम विभागाचे झोन एक ते झोन सहा असे विभाग आहेत. सर्व विभागांना आज सकाळी नियमांचे पालन न करणाऱ्या प्रकल्पांना थेट काम थांबविण्याची नोटीस देण्याचे आदेश दिले होते, पण झोन पाचकडून ६७ बांधकाम प्रकल्पांना नोटीस बजावण्यात आली, पण त्यांचे काम न थांबविता उपाययोजना करण्यासाठी ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या विभागात कडक कारवाई करण्यात आलेली नाही.

महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नियमावतील तरतुदी पुढील प्रमाणे

– बांधकामाच्या सिमाभिंतीला २५ फूट उंचीचे पत्रे लावणे
– बांधकाम सुरू असलेला भाग हिरव्या कापडाने झाकणे
– या कापडावर पाणी मारून धूळ उडण्यावर नियंत्रण आणणे
– रस्त्याच्या कडेला काम सुरू असल्यास त्यावर वर्दळीच्या वेळी पाणी मारणे
– राडारोडा वाहतूक करताना तो झाकून न्यावा
– राडारोडा व बांधकाम साहित्य वाहतूक करणाऱ्या गाड्यांची टायर धुण्याची व्यवस्था असावी
– बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्यांना गॉगल, मास्क, हेल्मेटसह अन्य साधणे द्यावेत
– गाड्यांमधून माल उतरविताना परिसरात पाणी मारावे

झोन निहाय काम बंद करण्याचे आदेश

झोन एक – ४४
झोन दोन – १५
झोन तीन – ८
झोन चार – १६
झोन पाच – ६७
झोन सहा – २२

Web Title: Pmc notice to air pollution construction sites pune marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2024 | 02:35 AM

Topics:  

  • Pune

संबंधित बातम्या

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी
1

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम
2

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद
3

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.