पुणे एसटी विभाग जादा बसेस सोडणार (फोटो- सोशल मिडिया)
गर्दी कमी करण्यासाठी जादा बसेस सोडण्याचा निर्णय
एसटी विभागातून उन्हाळ्यात ७४ अतिरिक्त गाड्या
पुणे एसटी विभागाचा मोठा निर्णय
पुणे: महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) पुणे विभागातून उन्हाळी सुट्ट्यातील गर्दी कमी करण्यासाठी ७४ बसेस अतिरिक्त सोडण्यात येणार आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत विद्यार्थी,शिक्षक,विविध क्षेत्रातील कर्मचारी आणि कारखान्यातील कामगार मोठ्या प्रमाणात गावाकडे जात असतात.त्यामुळे होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दि.१४ एप्रिल ते १० जून २०२६ दरम्यान (MSRTC) जादा बसेस सोडण्याचा निर्णय पुणे एसटी विभागाने घेतला आहे.
अतिरिक्त गाड्या कुठे सोडल्या जाणार?
अतिरिक्त गाड्या साधारणता अक्कलकोट,तासगाव,कोल्हापूर,पंढरपूर,जळगाव,कळण, सप्तशृंगी,अकोला,अहमदपूर,गोंदवले या ठिकाणी सोडल्या जाणार आहेत.
उन्हाळ्यात प्रवाशांना आपल्या गावी जाण्यासाठी पुणे एसटी विभागातून साधारणता ७४ अतिरिक्त गाड्या सोडल्या जाणार आहेत.प्रवाशांनी एसटीतून प्रवास करून या सेवेचा लाभ घ्यावा.
– कमलेश धनराळे,
विभागीय वाहतूक अधिकारी, पुणे एसटी विभाग
पुणे विभागात ‘राजमाता जिजाऊ’ शटल बस दाखल
राज्य परिवहन महामंडळ (एसटी) महिला आणि इतर प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देणारी आधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ शटल बस पुण्यात बुधवारी (दि.२५) रोजी दाखल झाली आहे.५६ सीटची एक बस पुण्यात आली असून स्वारगेट-बारामती सेवेला प्रारंभ झाला.पुणे शहरात पाठवलेली ही राज्यातील पहिली बस आहे.पुढील दोन महिन्यात पुणे विभागात २५० बस दाखल होणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे यांनी दिली आहे.
MSRTC News: पुणे विभागात ‘राजमाता जिजाऊ’ शटल बस दाखल; पुढील दोन महिन्यात…
राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बस तयार करण्यात आली असून ही बस विनावातानुकूलित आहे. या बसेस प्रामुख्याने दोन शहरांदरम्यानच्या अतिगर्दीच्या मार्गांवर शटल सेवेसाठी चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल.
नव्या बसेसची वैशिष्ट्ये
या बसेसमध्ये एकूण ५६ आसन क्षमता आहे, जी सध्याच्या बसेसपेक्षा १६ आसनांनी अधिक आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी आणि सुलभ प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या डॅशबोर्डवर १ तर बसमध्ये ४ सीसीटीव्ही कॅमेरे असे एकूण ५ कॅमेरे आहेत.तसेच जीपीएस यंत्रणा, पॅनिक बटन, पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक मार्ग फलक यांचा समावेश आहे.यामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि स्मार्ट होणार आहे.






