शिक्रापूर : शिक्रापूर (ता.शिरूर) पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक अशोक केदार यांना सायंकाळच्या सुमारास पोलीस स्टेशनच्या पार्किंगमध्ये एक दुर्मिळ साप दिसून आला. त्यांनी लगेचच येथील सर्पमित्राला फोन करून माहिती दिली.
यावेळी सर्पमित्रांनी तातडीने पोलीस स्टेशन येथे धाव घेत पाहणी केली असता तेथे दुर्मिळ असा पोवळा जातीचा विषारी असल्याचे दिसून आले. दरम्यान, सर्पमित्र यांनी या सापाला पकडून जीवदान देत निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले आहे.