सांगलीच्या औदुंबर दत्त मंदिरात शिरलं पाणी
राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सांगली जिल्ह्यात देखील गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. सांगलीमधील शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरात देखील पावसाची संततधार सुरु आहे. सततच्या पावसामुळे परिसरातील नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहत असून रस्ते जलमय झाले आहेत. सततच्या पडणाऱ्या पावसाने वारणा आणि कृष्णा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. तसेच पलूस तालुक्यातील औदुंबर येथील श्री दत्त मंदिरात देखील पाणी शिरलं आहे. त्यामुळे भाविकांची गैरसोय होत आहे.
हेदेखील वाचा – नवी मुंबईत पावसाचा जोर वाढला! दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर
सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरामध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पाऊस बरसत आहे. सतत सुरु असणाऱ्या पावसामुळे या परिसरातील नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. वारणा नदीवरील बरेच बंधारे पाण्याखाली गेले असून वारणा नदी पात्राबाहेर पडली आहे. वारणा नदी पात्रा बाहेर पडल्याने नदीकाठच्या पिकात नदीचे पाणी शिरले आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथील सांगली-कोल्हापूर जिल्ह्याला जोडला जाणारा पुल पाण्याखाली गेला आहे.
सततच्या पडणाऱ्या पावसामुळे सांगली जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे नदीचे पाणी पात्र बाहेर पडत आहे. तसेच पलूस तालुक्यातील औदुंबर येथील श्री दत्त मंदिरात देखील पाणी शिरलं आहे. त्यामुळे भाविकांना मंदिराकडे जाण्यास बंदी घालण्यात आली असून भाविकांची गैरसोय होत आहे. नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. रविवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत सांगलीच्या कृष्णा नदीची नदीपातळी १८ फुटांवर गेली होती. अलमट्टी धरणातील विसर्गही आता दीड लाखाने सुरू करण्यात आला आहे. वारणा धरणातून दीड हजारावर क्युसेकने विसर्ग सुरू आहे. मात्र वारणा नदीवरील बरेच बंधारे पाण्याखाली गेले असून वारणा नदी पात्राबाहेर पडली आहे. वारणा नदी पात्रा बाहेर पडल्याने नदीकाठच्या पिकात नदीचे पाणी शिरले आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेदेखील वाचा – मुंबई उपनगरात दमदार पावसाची हजेरी; रस्ते जलमय; वाहतूक सेवा विस्कळित; नागरिकांचे हाल
सातारा, सांगली, कोल्हापूर, तसेच आसापासच्या जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती आणि वाशिम या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आज भंडारा जिल्हात रेड अलर्ट जाहीर केला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्याला देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक, नंदुरबार, धुळे जळगाव जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.