'माझी प्रकृती नाजूक...'; राज ठाकरेंनी दोन मिनिटात आटोपलं भाषण
राज ठाकरेंची आज भिवंडीत सभा झाली, मात्र त्यांनी अवघ्या दोन मिनिटात भाषण आटोपतं घेतलं. मी सगळीकडे बोलून आलो आहे, आता काय बोलायचं ते सांगितलं. मात्र ऐकायला कोणी तयार नसतात. माझी थोडीशी प्रकृती नाजूक आहे. थोडं बरं वाटत नाहीय. म्हणून मी तुमचं दर्शन घेण्याकरता आलो आहे, प्रत्यक्षात भेटलो, असं म्हणत त्यांनी भाषण आटोपत घेतलं.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी यावेळची निवडणूक थोडीशी वेगळी राहिली आहे. कारण राज ठाकरे यांनी या निवडणुकीआधी आणि निवडणूक प्रचारातही महाराष्ट्र पिंजून काढला आहे. राज ठाकरेंनी प्रचारात मुसंडी मारली असून राज्यातील विविध कोपऱ्यात जाऊन प्रचारसभा घेत आहेत. परंतु, गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचारसभांमुळे राज ठाकरे एकटे प्रचार करतायेत. त्यामुळे त्यांच प्रकृती नाजूक झाली असल्याची माहिती राज ठाकरेंनी आज दिली.