Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई उपनगर जिल्ह्याचा महिलांसाठी ‘रक्षा पॅटर्न’, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई उपनगराच्या जिल्हाधिकाऱ्यांना महिला आणि बालकांच्या सुरक्षेसंदर्भात एका पत्राद्वारे महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. या पत्रामध्ये शाळा महाविद्यालयांमध्ये मुलींच्या सुरक्षिततेबाबत मह्त्वाच्या सूचना केल्या आहेत त्याची अंमलबजावणी करण्यास जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले गेले आहे.

  • By नारायण परब
Updated On: Aug 21, 2024 | 09:09 PM
फोटो सौजन्य- X

फोटो सौजन्य- X

Follow Us
Close
Follow Us:

कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई उपनगराच्या जिल्हाधिकाऱ्यांना महिला आणि बालकांच्या सुरक्षेसंदर्भात एका पत्राद्वारे महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. महिला व बालकांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी मुंबई उपनगरातील विविध शाळा महाविद्यालयात महिला व विद्यार्थीनींच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात असे या पत्रात प्रामुख्याने सांगण्यात आले आहे.

त्याचबरोबर आज बांद्रा येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना, राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था व मुंबई उपनगरमधील प्रत्येक महाविद्यालयात १ सप्टेंबरपासून युवतींना स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

आपल्या पत्रात मंत्री लोढा म्हणाले, “महिला आणि बालकांविरुद्ध वाढणारे अत्याचार ही सरकारसाठी, प्रशासनासाठी आणि आपल्या समाजासाठी चिंतेची बाब आहे. बदलापूरमध्ये झालेल्या घटनेचे पडसाद म्हणून, नागरिकांनी काही उपाययोजना सुचवल्या आहेत. महिलांच्या सुरक्षेबाबत केलेल्या दुर्लक्षामुळे अशा घटना घडताना दिसत आहेत. ही बाब लक्षात घेऊन मुंबई उपनगरातील केजी ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत सर्व शैक्षणिक संस्थांना सक्त निर्देश द्यावेत. शाळा व महाविद्यालयाने आणि विविध संस्थांनी आपल्याकडे नियुक्त केलेल्या स्टाफची देखील खात्रीपूर्वक तपासणी करावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी!”

पत्रात मंत्री लोढा यांनी केलेल्या सूचना 

१. शाळा परिसरात स्वच्छतागृह वगळता संपूर्ण परिसर CCTV च्या कक्षेत आणावे. त्यासाठी कॅमेरे बसवावे व ते कायम सुरक्षित, सुस्थितीत आहेत याची पडताळणी बिट मार्शल / फिरते पोलीस पथक यांनी वेळोवेळी करावी.

२. मुलींच्या स्वच्छतागृहांबाहेर एका महिला कर्मचाऱ्यास कायम देखरेखीसाठी नियुक्त करण्यात यावे.

३. अल्पवयीन मुलींसाठी व दहावीत शिकणाऱ्या मुलींसाठी असणाऱ्या स्वच्छतागृहांच्या स्वच्छता कर्मचारी महिला असतील याची सक्तीने अंमलबजावणी करावी.

४. विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी कार्यरत असणाऱ्या बसेस, टॅक्सी, व्हॅन यामध्ये एक महिला कर्मचारी असणे सक्तीचे करावे.

५. शाळेत कार्यरत स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्यावे.

६. मुलींना स्व-संरक्षणाचे धडे द्यावेत, यासाठी शाळा प्रशासनाने स्थानिक स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी.

७. शाळेत उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत बालकांनी / मुलांनी त्या शाळेची तक्रार १०९८ या हेल्पलाईन नंबरवर नोंदवावी. या बाबतीत शाळेत भित्तीपत्रके लावण्यात यावीत.

८. शाळेत महिला पालकांची एक स्वतंत्र समिती स्थापन करण्यात यावी. या बैठकीची दर महिन्याला बैठक घेऊन मुलींच्या समस्यांविषयी चर्चा व्हावी.

९. महिला आणि मुलींना आपत्कालीन परिस्थितीत १८१ या हेल्पलाईनचा वापर करण्याबाबत सर्व शाळा महाविद्यालयांना प्रत्येक वर्गात, परिसरात भित्तीपत्रके लावण्याच्या सूचना देण्यात याव्या.

Web Title: Raksha pattern for women in mumbai suburban district guardian minister mangalprabhat lodha instructed district collectors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2024 | 09:09 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.