औरंगाबाद : एखाद्या श्रीमंत माणसाचं अपहरण करुन कोट्यवधीची खंडणी मागितल्याच आपण सिनेमातून पाहिलं आहे. मात्र, असा एक खराखुरा प्रकार औरंगाबाद झाला असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या निवृत्त सहसंचालकाचे अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. तसेच अपहरकर्त्यांनी तब्बल 2 कोटी 80 लाख रुपयांची खंडणी मागितली आहे.
[read_also content=”धक्कादायक! १२ प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसने घेतला पेट https://www.navarashtra.com/maharashtra/shocking-a-running-bus-carrying-12-passengers-caught-fire-327345.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातून निवृत्त झालेले विश्वनाथ राजळे (वय,62) यांच पाच ते सहा जणांनी अपहरण केलं होतं. विशेष म्हणजे अपहरणकर्त्यांनी या माजी अधिकाऱ्याला सोडण्यासाठी थोडी नव्हे तर सुमारे 2 कोटी 80 लाख रुपयांची खंडणीही मागितली. या हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचताच त्यांनाी तपास सुरू केला. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी चक्र फिरवत अखेर अपहरणकर्त्यांना बेड्या ठोकत ताब्यात घेतले. तसेच या प्रकरणी पोलिसांनी सहा संशयित आरोपींना ताब्यात घेतले.
[read_also content=”सोनाली फोगट हत्येचा तपास करण्यासाठी सीबीआय रिसॉर्टमध्ये दाखल, कर्मचाऱ्यांचे जबाबही नोंदवले https://www.navarashtra.com/india/sonali-phogat-murdered-tapas-karanyasathi-cbi-resort-middle-entry-employees-response-nondavale-nrps-327235.html”]