Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जमिनीचे व्यवहार होणार एका छताखाली; महसूल विभागाचे राज्यात 1 जूनपासून महाराजस्व अभियान…

महसूल विभागाच्यावतीने राज्यात १ जून ते ३१ जुलै दरम्यान ‘महाराजस्व अभियान’ राबविण्यात येणार आहे. महसूल विभागाचे सहसचिव डॉ.सत्यनारायण बजाज यांनी याबाबत अध्यादेश जारी केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 23, 2025 | 06:44 PM
Revenue Department organizes Maharaj Swami Abhiyan in the maharashtra in the month of June

Revenue Department organizes Maharaj Swami Abhiyan in the maharashtra in the month of June

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक यांचे महसूल विभागातील विविध कार्यालयात प्रलंबित असलेली प्रश्न निकाली काढण्यासाठी महसूल विभागाच्यावतीने राज्यात १ जून ते ३१ जुलै दरम्यान ‘महाराजस्व अभियान’ राबविण्यात येणार आहे. महसूल विभागाचे सहसचिव डॉ.सत्यनारायण बजाज यांनी याबाबत अध्यादेश जारी केला आहे. या अभियानांतर्गत एका महिन्याचा आता प्रलबिंत असलेले फेरफार निकाली काढणे, त्यासाठी मंडळनिहाय फेरफार अदालतीचे आयोजन करणे बंधनकारक केले आहे. याचबरोबर तहसील, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी या स्तरावर एक ते तीन महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी प्रलंबित असलेल्या फेरफार निकाली काढण्यात येणार आहेत.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

भूसंपादन केलेल्या अकृषिक परवानगी (एन.ए. ऑर्डर) कमी जात पत्रके तयार करून गाव दप्तर अद्यावत करणे. जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ४२ (ब), ४२ (क), आणि ४२ (ड ) नुसार समाविष्ट होणा-या जमीनींच्या भोगवटदारांकडून अकृषिक रक्कम आकारणीची रक्क्म भरून घेणे आणि त्या अनुषंगाने संबधितांना सनद देण्याचे तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व मिळकत धारकांना देण्याच्या अकृषिक आकारणी मागणीची नोटिसा देणे, त्याची तातडीने कारवाई करणे, गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद केलेले गाडी रस्ते, पाणद, पांधण, शेतरस्ते, शिवाररस्ते, शेतावर जाण्याचे मार्ग मोकळे करणे तसेच वहिवाटिचे रस्ते मोकळे करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतक-यांना त्याचा लाभ होण्यास मदत होणार असल्याने, ही मोहिम सर्व जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

या अभियानात गाव तिथे स्माशानभूमी, दफनभूमी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. लोकसेवा हक्क अधिनियम -२०१६ ची प्रभावी अंमलबजावणी करणे. शैक्षणिक प्रयोजनासाठीचे दाखले व नागरिकांना उपलब्ध करून देणे.त्यासाठी गावपातळीवर शिबीरे घेणे. वाजिब -उल -अर्ज च्या नोंदी अद्यावत करणे, मोजणी प्रकरणे निकाली काढणे, ई-पीक पाहणी प्रकल्पाची अंमबजावणी करण्यात येणार आहे. औद्योगिक कंपन्याना प्रयोजनाकरिता संपादित जमिनींच्या विक्री /वापर बदलाबाबतची सध्यस्थिती तपासणे. वाळू साठा कार्यपध्दती निश्चित करणे. गौण खनिज ऑनलाईन प्रणालीचे माहिती अद्ययावत करणे. पोटहिस्सा, सामिलीकरण, भू संपादन रस्ता, सेटबॅक या कारणामुळे होणाऱ्या बदलामुळे दुरूस्तीसह अद्ययावत नकाशा करणे. अनुसुचित जमाती शेतकरी खातेदारांच्या शेतजमीनी, खातेफोड, पोट विभाजन करण्यासाठी मोहिम राबविणे, ई-हक्क, सलोखा योजना, जिंवत सातबारा यांची अंमलबजाणी करावी. सिंधी समाजासाठी विशेष अभय योजनेची अंमलबजाणे करणे. नागपूर, अमरावती विभागातील निवाशी प्रयोजनासाठी भाडेतत्वावर दिलेल्ल्या नझुल जमीनीबाबत विशेष अभय योजना राबविणे, यासह विविध योजना या महाराजस्व अभियानात राबविण्यात येणार आहेत.

Web Title: Revenue department organizes maharaj swami abhiyan in the maharashtra in the month of june

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 06:44 PM

Topics:  

  • Revenue Department

संबंधित बातम्या

Jaykumar Gore: “लोकसंख्येच्या निकषावर पात्र असणाऱ्या…”; मंत्री जयकुमार गोरेंच्या विभागीय आयुक्तांना सूचना
1

Jaykumar Gore: “लोकसंख्येच्या निकषावर पात्र असणाऱ्या…”; मंत्री जयकुमार गोरेंच्या विभागीय आयुक्तांना सूचना

Devendra Fadnavis: “महसूल विभाग राज्यातील जनतेला…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
2

Devendra Fadnavis: “महसूल विभाग राज्यातील जनतेला…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती बनतेय बिकट; एसटी कामगारांच्या वेतनामधूनही केली जातेय कपात
3

एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती बनतेय बिकट; एसटी कामगारांच्या वेतनामधूनही केली जातेय कपात

Ajit pawar: “चक्की पिसिंगसाठी मोक्काखाली…”; अजित पवारांनी कोणाला दिला थेट इशारा?
4

Ajit pawar: “चक्की पिसिंगसाठी मोक्काखाली…”; अजित पवारांनी कोणाला दिला थेट इशारा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.