Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Talath News: तलाठ्यांचे काम झाले सुकर! राज्यातील सर्व फेरफार नोटिसा आता ऑनलाइन; भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय

महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागाने सातबारा आणि फेरफारच्या नोटिसा ऑनलाइन बजावण्याचा निर्णय घेतला आहे. तलाठ्यांमार्फत पोस्ट ऑफिसद्वारे या नोटिसा आता थेट पक्षकारांना मिळणार आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 05, 2026 | 02:43 PM
तलाठ्यांचे काम झाले सुकर! राज्यातील सर्व फेरफार नोटिसा आता ऑनलाइन (photo Credit- AI)

तलाठ्यांचे काम झाले सुकर! राज्यातील सर्व फेरफार नोटिसा आता ऑनलाइन (photo Credit- AI)

Follow Us
Follow Us:

 

  • तलाठ्यांचे काम झाले सुकर!
  • राज्यातील सर्व फेरफार नोटिसा आता ऑनलाइन
  • भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय
दिनेश गुप्ता। नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर: सातबारा नोटीस, उताऱ्यातील फेरफारच्या न्यायालयीन प्रकरणांमधील नोटीस तसेच महाराष्ट्र महसूल संहितेतील अपिलांमधील नोटिस आता तलाठ्यांकडून पोस्ट ऑफिसमध्ये ऑनलाइन देण्यात येणार आहेत. पोस्ट ऑफिसमधून या नोटीस थेट पक्षकारांना बजावल्या जाणार आहेत. त्यामुळे तलाठ्यांचे काम सुकर होऊन पक्षकारांनाही या नोटीसा बजाविल्या जाणार याची खात्री करता येणार आहे. ऑफलाइन प्रकारात अनेकदा तलाठी आणि पक्षकारांकडून नोटीस बजावणे आणि त्या न मिळणे अशा स्वरूपाच्या तक्रारी येत होत्या. त्यावर भूमी अभिलेख विभागाने हा उपाय काढला आहे. पुढील दोन महिन्यात राज्यभरात हा उपक्रम सर्वच गावांमध्ये सुरू करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे.

गावपातळीवर महसूल विभागाचा प्रतिनिधी म्हणून तलाठी काम करत असतो. नागरिकांपर्यंत माहिती पोचविण्यासाठी तलाठी वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये नोटिसा काढत असतो. त्यात खरेदी विक्री झाल्यानंतर संबंधितांना त्यांच्याशी संबंधित असणाऱ्यांना नोटीसा बजावल्या जातात. वारस नोंदी घेताना देखील अशा स्वरूपाच्या संबंधितांना नोटीसा बजावल्या जातात, त्याचप्रमाणे न्यायालयीन नोटीसा, अपिलाच्या नोटीसह फेरफार या नोटिसादेखील तलाठ्याकडून बजावल्या जातात. याची संख्या मोठी असल्याने तलाठ्यांवर कामाचा मोठा भार असतो.

मनपाचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ रेडी! नगरसेवक अन् अधिकारी प्रभागात काढणार प्रभातफेरी; प्रत्येक वॉर्डाला ५० कोटींचा निधी

नोटिफिकेशन तलाठ्याकडे

अनेकदा संबंधित पक्षकारांना नोटीस बजावूनही त्या मिळत नाहीत, कार्यालयीन कामकाजाच्या भारामुळे देखील तलाठ्याकडून वेळेत नोटीस देणे होत नाही. यावर उपाय म्हणून भूमी अभिलेख विभागाने आता या नोटिसा ऑनलाईन पद्धतीने बजावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता तलाठ्याकडे आलेली नोटीस ऑनलाइन पद्धतीने पोस्ट ऑफिसामध्ये दिली जाणार आहे. पोस्ट ऑफिस ही नोटीस प्रिंट करून, ती संबंधित पक्षकाराला रजिस्टर पोस्टाने पाठविणार आहे. संबंधित पक्षकाराला नोटीस बजावण्यात आल्याचे नोटिफिकेशन तलाठ्याकडे जाणार आहे.

पुणे संचालक आयटी, भूमी अभिलेख,  विकास गजरे म्हणतात…

या नोटीसा तलाठ्यांकडे आल्यानंतर त्यात आहेत. पोस्ट ऑफिसच प्रिट करून त्यावर योग्य तो ते तिकीट लावून पक्षकाराकडे पाठवणार. त्याचे ट्रॅक रेकॉर्ड ठेवले जाणार असून ते तलाठी पाहू शकणार आहे. या सर्व नोटिसांचे ट्रॅक रेकॉर्ड जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्व अधिकाऱ्यांना पाहता येणार आहे.

पुणे जिल्ह्यात उपक्रम

नोटीस मिळाल्यानंतर त्याची पोच ही ऑनलाईनच तलाठ्याला मिळणार आहे. त्यामुळे आता तलाठ्याला ऑफलाईन पद्धतीने नोटिसा बजावण्याची गरज भासणार नाही. तसेच यासंदर्भात दोन्ही बाजूंकडून येणाऱ्या तक्रारी देखील येणार नाहीत. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील वाऊंड आणि साते या दोन गावांमध्ये हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाची चाचणी यशस्वी झाली असून पुढील दोन महिन्यांत या उपक्रमाची संपूर्ण राज्यात अंमलबजावणी करण्यात येणार येणार आहे.

“हेलिकॉप्टरचा वापर रिक्षासारखा…”, मंत्री Sanjay Shirsat संतापले; खासगी कंपन्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित

Web Title: Maharashtra revenue department online notice system talathi post office integration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • post office
  • Revenue Department

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल
1

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती
2

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!
3

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!

गौण खनिज महसूल वसुलीला ‘ब्रेक’; 8 महिन्यांत 89 कोटींचे उद्दिष्ट गाठण्याचे विभागासमोर आव्हान
4

गौण खनिज महसूल वसुलीला ‘ब्रेक’; 8 महिन्यांत 89 कोटींचे उद्दिष्ट गाठण्याचे विभागासमोर आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.