Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आठ नद्यांच्या पाण्याने 11000 ब्राह्मणांच्या उपस्थितीत अभिषेक, 32 मण सोन्याचं सिंहासन आणि सप्तधातूंची तुला, 350 वर्षांपूर्वी कसा पार पडला होता शिवराज्याभिषेक सोहळा?

रायगडावर 6 जून इ.स. 1674 रोजी छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा गागाभट्ट यांनी राज्याभिषेक झाला. या भव्यदिव्य सोहळ्यासाठी 32 मण सोन्याचे सिंहासन बनवलं गेलं होतं.

  • By साधना
Updated On: Jun 01, 2023 | 01:44 PM
shivrajyabhishek

shivrajyabhishek

Follow Us
Close
Follow Us:

यंदा तिथीनुसार रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj Rajyabhishek) राज्याभिषेक सोहळा 2 जूनला साजरा होणार आहे. तसेच 6 जूनला तारखेप्रमाणे राज्याभिषेक (Shivrajyabhishek) सोहळा संपन्न होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने जे विधी त्यावेळी करण्यात आलेल्या विधीपैकी मुंज आणि लग्नाचे विधी सोडले तर त्यातील बहुतांश विधी यावर्षी करण्यात येणार आहेत. या सोहळ्यात 350 वर्षांपूर्वी नक्की काय घडलं होतं जाणून घेऊयात. (Shivrajyabhishek Din 2023)

32 मण सोन्याचं सिंहासन
रायगडावर 6 जून इ.स. 1674 रोजी छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा गागाभट्ट यांनी राज्याभिषेक झाला. या भव्यदिव्य सोहळ्यासाठी 32 मण सोन्याचे सिंहासन बनवलं गेलं होतं. शिवराज्यभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यांतून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. सुमारे 11000 ब्राह्मण आणि इतर लोक मिळून जवळपास लाखभर लोक रायगड या ठिकाणी जमा झाले होते. चार महिने पाहुण्यांची राहण्याची व्यवस्था, स्वादिष्ट भोजन अशी तयारी केली जात असे. या सोहळ्यामध्ये ब्राह्मण, श्रीमंत गणमान्य व्यक्ती, दुसऱ्या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सगळेच उपस्थित झाले होते. या सोहळ्यासाठी साडेचार हजार राजांना निमंत्रणं देण्यात आली होती.

सप्तधातूंची तुला
राज्याभिषेकापूर्वी महाराजांनी विविध मंदिरांत जाऊन देवाचं दर्शन घेतलं. सव्वा मण सोन्याची छत्री भवानी मातेला अर्पण केली. नंतर 21 मे पासून ते रायगडावर धार्मिक विधीच्या कामात होते. महाराजांनी 28 मे ला प्रायश्चित्त केलं आणि जानवं परिधान केले. दुसऱ्या दिवशी दोन राण्यांबरोबर त्यांनी पुन्हा विवाह विधी केला. दुसऱ्या दिवशी महाराजांची सोने, चांदी, तांबे, जस्त, कथील, शिसे, लोखंड अशा सात धातूंनी वेगवेगळी तुला झाली. याशिवाय वस्त्र, कापूर, मीठ, खिळे, मसाले, लोणी, साखर, फळे इत्यादींच्या तुला झाल्या. लाखभर होन ब्राह्मणांना देण्यात आले.

आठ नद्यांच्या जलाचा अभिषेक
राज्याभिषेकाच्या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चारासह आंघोळ करून मग कुलदेवतेला स्मरून, प्रमुख ब्राह्मणांच्या पायी पडून, राज्याभिषेकाचा सोह‌ळ‌ा करण्यात आला. यावेळी शिवाजी महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केलं होतं. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणं हे दोन प्रमुख विधी होते. दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर शिवाजी महाराज बसले. आठ प्रधान नद्यांतून आणलेल्या पाण्याने शिवाजी महाराजांवर अभिषेक करण्यात आला होता. सोळा सुवासिनींनी पंचारती ओवाळली. यानंतर शिवाजी महाराजांनी लाल रंगाचं वस्त्र परिधान केलं. जडजवाहिर, अलंकार परिधान केले. गळ्यात फुलांचे हार घातले. राज मुकुट घातला. आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली. ठरलेल्या मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला.

सोन्याचांदीच्या फुलांची उधळण, वाद्य आणि तोफांचा आवाज
राजसिंहासनाचं दालन 32 शकुन चिन्हांनी सजवलेले होते. शिवाजी महाराज 32 मण सोन्याच्या सिंहासनावर आरुढ झाले. सोळा सुवासिनींनी त्यांना ओवाळलं. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रोच्चारण केलं. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ च्या घोषणा दिल्या गेल्या. सोन्याचांदीची फुलं उधळली गेली. विविध ताल वाद्य-सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेला. ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत ‘शिवछत्रपती’ म्हणून आशीर्वाद दिला.

Web Title: Rituals took place at chattrapati shivaji maharaj rajyabhishek sohala happened 350 years befure nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2023 | 01:28 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.