Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुषार खरात यांच्याविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा; ‘पुराव्याशिवाय बदनामी केल्यास कोणालाही सोडणार नाही’

पत्रकारितेच्या मूलभूत नियमांनुसार कोणतीही बातमी प्रसारित करण्यापूर्वी तिची सत्यता तपासणे आणि संबंधितांची बाजू जाणून घेणे आवश्यक आहे. मात्र, आपली बाजू न ऐकता एकतर्फी आणि बदनामीकारक व्हिडिओ प्रसारित करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 08, 2026 | 12:33 PM
तुषार खरात यांच्याविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा; 'पुराव्याशिवाय बदनामी केल्यास कोणालाही सोडणार नाही'

तुषार खरात यांच्याविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा; 'पुराव्याशिवाय बदनामी केल्यास कोणालाही सोडणार नाही'

Follow Us
Follow Us:
  • तुषार खरात यांच्याविरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
  • राजू भैय्या भोसले यांची पत्रकार परिषद
  • सोशल मीडियावरील बदनामीविरोधात आक्रमक भूमिका
सातारा : सोशल मीडियाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक बदनामी करण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. पुराव्याशिवाय आरोप करून कोणाचीही प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा आक्रमक इशारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भैय्या भोसले यांनी दिला. यूट्यूबवरील ‘लय भारी’ चॅनेलचे पत्रकार तुषार खरात यांच्याविरोधात भोसले यांनी १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला असून, न्यायालयाने त्यांच्या बाजूने तात्पुरता मनाई आदेश दिल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तुषार खरात यांनी २४ ऑक्टोबर २०२६ रोजी आपल्या यूट्यूब चॅनेलवरून भोसले यांच्याबाबत तसेच तारळे धरण परिसरातील अदानी समूहाच्या वीज निर्मिती प्रकल्पाशी संबंध जोडणारे व्हिडिओ प्रसारित केले होते. या व्हिडिओंमध्ये वाल्मिक कराड यांच्याशी तुलना करणे, रस्ता रुंदीकरणासाठी शेतकऱ्यांच्या जमिनींचा वापर, बेकायदेशीर कामकाज आणि गुंडगिरीसारखे आरोप करून आपली सामाजिक प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा भोसले यांनी केला.

पत्रकारितेच्या मूलभूत नियमांनुसार कोणतीही बातमी प्रसारित करण्यापूर्वी तिची सत्यता तपासणे आणि संबंधितांची बाजू जाणून घेणे आवश्यक आहे. मात्र, आपली बाजू न ऐकता एकतर्फी आणि बदनामीकारक व्हिडिओ प्रसारित करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी कायदेशीर सल्लागार अॅड. कमलेश पिसाळ यांच्यामार्फत संबंधित पत्रकार, त्यांची कंपनी तसेच गुगलला कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली होती. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने सातारा येथील दिवाणी न्यायालयात विशेष दिवाणी दावा क्रमांक २३१/२०२६ दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या दाव्यासोबत दाखल केलेला तात्पुरत्या मनाई आदेशाचा अर्ज न्यायालयाने मंजूर केला असून, तुषार खरात आणि लय भारी न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना भोसले यांच्याविरोधात बदनामीकारक व्हिडिओ प्रसारित न करण्याबाबत तात्पुरती ताकीद दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. १६ नोव्हेंबर रोजी न्यायालयात उपस्थित राहून आपली बाजू मांडण्याची संधी संबंधितांना देण्यात आली आहे.

बदनामीचे प्रयोग खपवून घेणार नाही

परळी भागातील गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडविणे आणि विकासासाठी आमचे कुटुंब अनेक दशकांपासून कार्यरत आहे. निवडणुकीतून पराभूत करता येत नसल्याने अफवा आणि बदनामीचा मार्ग अवलंबला जात आहे. मात्र, अशा प्रकारांना मी भीक घालणार नाही. यापुढे तुषार खरातच नव्हे, तर कोणीही पुराव्याशिवाय बदनामीकारक वक्तव्य केल्यास त्याच्याविरोधात अब्रुनुकसानीसह फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशाराही भोसले यांनी दिला. या पत्रकार परिषदेला अॅड. कमलेश पिसाळ, अॅड. इरा भोसले, जिल्हा परिषद सदस्य कामेश कांबळे, अजित साळुंखे आदी उपस्थित होते.

FAQ

1. तुषार खरात यांच्याविरोधात किती रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे?
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भैय्या भोसले यांनी तुषार खरात यांच्याविरोधात १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

2. राजू भैय्या भोसले यांनी कोणता इशारा दिला?
पुराव्याशिवाय आरोप करून कोणाचीही बदनामी किंवा प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

3. तुषार खरात कोणत्या माध्यमाशी संबंधित आहेत?
तुषार खरात हे यूट्यूबवरील ‘लय भारी’ या चॅनेलशी संबंधित पत्रकार आहेत.

Web Title: Rs 100 crores defamation suit filed against tushar kharat nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 12:33 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.