Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विधानसभेआधी राज्य सरकारचा निर्णयांचा धडाका; सरपंच, उपसरपंचांच्या मानधनात तब्बल ‘इतक्या’ रूपयांची वाढ

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 23, 2024 | 05:13 PM
विधानसभेआधी राज्य सरकारचा निर्णयांचा धडाका; सरपंच, उपसरपंचांच्या मानधनात तब्बल 'इतक्या' रूपयांची वाढ

विधानसभेआधी राज्य सरकारचा निर्णयांचा धडाका; सरपंच, उपसरपंचांच्या मानधनात तब्बल 'इतक्या' रूपयांची वाढ

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. नोहेंबरच्या सुरूवातीला किंवा शेवटच्या टप्प्यात राज्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्याआधी राज्य सरकाने अनेक निर्णय घेण्याचा धडाकाच लावला आहे. दरम्यान आज राज्य सरकारची कॅबिनेट बैठक पार पडली. आज झालेल्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने सरपंच आणि उपसरपंच यांच्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने सरपंच आणि उपसरपंच यांचे मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारने सरपंच आणि उपसरपंच यांचे मानधन वाढवण्याचा निर्णयाला मंजुरी दिली. ग्रामविकास विभागाने याबद्दल माहिती दिली आहे. विधानसभा निवडणुकीआधी हा निर्णय घेण्यात आला आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामविकास विभागाच्या सहा मागण्यांना कॅबिनेटकडून मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने सरपंच आणि उपसरपंच यांचे मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

सरपंच आणि उपसरपंच यांचे मानधन किती वाढणार?

ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या २००० इतकी आहे. त्या सरपंचाचे मानधन ३ हजारवरून ६ हजार इतके करण्यात आले आहे. तर उपसरपंचाचे मानधन १ हजारवरून २ हजार करण्यात येणार आहे. तसेच ज्या ग्राम पंचायतीची लोकसंख्या ८ हजार पेक्षा जास्त आहे. तिथे सरपंचाचे मानधन ५ हजारवरून १० हजार इतके करण्यात आले आहे. तर उपसरपंचाचे मानधन २ हजारवरून ४ हजार करण्यात येणार आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले निर्णय

१. लोहगाव विमानतळाचे नाव ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे’ असे करण्याचा निर्णय

२. बालगृहे निरीक्षणगृहातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना : शिक्षकांना वरिष्ठ निवड श्रेणी

३. धान उत्पादकांना दिलासा : आता प्रति क्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर

४. कुणबीच्या तीन पोटजातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश

५. जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय

६. शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग. १४८६ कोटीचा प्रकल्प

७. करदात्यांचे हित लक्षात घेऊन जीएसटी अधिनियमात सुधारणा

मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

👉 संक्षिप्त #मंत्रिमंडळनिर्णय खालीलप्रमाणे :

✅ लोहगाव विमानतळाचे नाव ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे’ असे… pic.twitter.com/zPNqKDEsBA

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 23, 2024

८. यवतमाळ, जळगांव जिल्ह्यातील सूतगिरणींना थकबाकी परतफेडीसाठी हप्ते

९. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना सुसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी वांद्रेतला भूखंड

१०. ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद

११. राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ

१२. मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्रेतील नव्या संकुलाचे बांधकाम; राज्याचा महत्त्वपूर्ण प्रकल्प

१३. हरित हायड्रोजन धोरणात अँकर युनिटची पारदर्शकपणे निवड करणार

१४. एसटी महामंडळाच्या जमिनी बीओटी तत्वावर विकसित करणार : साठ वर्षाचा भाडेपट्टा करार

१५. ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ

१६. राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ

१७. राज्यातील १४ आयटीआय संस्थांचे नामकरण

१८. छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील विधी विद्यापीठांना सात कोटी रूपये

१९. अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना थेट नियुक्ती देण्याच्या निर्णयात सुधारणा

२०. जलसंपदा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी

२०. श्रीरामपूर तालुक्यातील मौजे हरेगाव येथील शेती महामंडळाच्या जमिनी मूळ मालकांना परत करणार

२१. दूध अनुदान योजना सुरु राहणार. उत्पादकांना गायीच्या दूधासाठी लीटरमागे सात रुपयांचे अनुदान

२२. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण जाहीर

Web Title: Salary of sarpanch and deputy sarpanch will be doubled big decision in the state cabinet meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2024 | 05:07 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly Elction 2024
  • Sarpanch News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.