Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सलमान खान गोळीबारातील आरोपीची आत्महत्या हा राज्यातील मोठा कट; शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप

Salman Khan House Firing Case : हाय प्रोफाईल प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकारी, बडे राजकीय व्यक्तीदेखील असू शकतात, अशी शंकाही ठाकरे गटाच्या नेत्याने व्यक्त केली. मूलत: या प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येने राजकीय वर्तुळातसुद्धा खळबळ उडाली आहे.

  • By युवराज भगत
Updated On: May 02, 2024 | 04:39 PM
Salman Khan House Firing Case: Suicide of accused in Salman Khan shooting is a big conspiracy

Salman Khan House Firing Case: Suicide of accused in Salman Khan shooting is a big conspiracy

Follow Us
Close
Follow Us:
Salman Khan House Firing Case : सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना पिस्तूल आणि गोळ्या पुरवल्याच्या आरोपावरून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन आरोपींना पंजाबमधून अटक केली होती. त्यापैकी एक आरोपी अनुज थापन याने बुधवारी (1 मे रोजी) तुरुंगात चादरीने गळफास घेत आत्महत्या केली असल्याचे उघडकीस झाले आहे. मुंबईतील पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारात असलेल्या गुन्हे शाखेच्या इमारतीत पहिल्या मजल्यावरील लॉकअपमध्ये आरोपी अनुज थापनला ठेवण्यात आले होते.
तुरुंगात गळफास लावून आत्महत्या
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार (Salman Khan House Firing Case) करणाऱ्या आरोपींपैकी एक आरोपी असलेल्या अनुज थापन याने तुरुंगात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना म्हणजे मोठा कटच असल्याचा आरोप  शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena UBT) नेत्याने केला आहे. पोलीस कोठडीत हाय प्रोफाईल प्रकरणातील आरोपीने आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकारी, बडे राजकीय व्यक्तीदेखील असू शकतात, अशी शंकाही ठाकरे गटाच्या नेत्याने व्यक्त केली.
या घटनेत बडे अधिकारी, राजकीय नेते असण्याची शक्यता
एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आनंद दुबे यांनी म्हटले की, मुंबई पोलीस गुन्हे शाखेच्या कोठडीत आरोपीचा मृत्यू झाला आहे. या घटनेत मोठे पोलीस अधिकारी, राजकीय नेता देखील सहभागी असू शकतो अशी शंकाही आनंद दुबे यांनी उपस्थित केली. त्या ठिकाणी अनेक सीसीटीव्ही कॅमेरे आहेत.अनेक अधिकारी असतात. तरीही अशी घटना घडते म्हणजे ही घटना एक प्रकारे कटच असल्याची शंका दुबे यांनी व्यक्त केली.
फडणवीसांना आवाहन करणार….
आनंद दुबे यांनी म्हटले की, हे प्रकरण गांभीर्याने घेऊन कारवाई करावी, अशी मागणी पक्षाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करणार असल्याचे त्यांनी म्हटले.
शौचालयात केली आत्महत्या… 
बुधवारी एक मे रोजी, अनुज थापन हा बराच वेळ झाला तरी शौचालयातून बाहेर आला नाही. त्याला वारंवार हाका मारुनही प्रतिसाद न आल्याने  पोलिसांनी बळजबरीने शौचालयाचा दरवाजा तोडला. त्यावेळी त्याने गळफास घेतला असल्याचे दिसून आले. त्याला तातडीने गोकुळदास तेजपाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचे निधन झाले.
अनुजच्या कुटुंबीयांनी केली मागणी…
प्रसिद्ध वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, अनुजच्या कुटुंबीयांनी त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन मुंबईबाहेर करण्याची मागणी केली आहे. अनुज थापनचा भाऊ अभिषेकने म्हटले की, अनुजने आत्महत्या केली नाही. त्याला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी त्याने केली.
मुंबई पोलिसांची कारवाई
सलमान खानच्या घरावर 14 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली. गोळीबार करणाऱ्या आरोपींना मुंबई पोलिसांनी 72 तासांच्या आत गुजरातमधील भूज येथून बेड्या ठोकल्या. त्यानंतर काही दिवसातच त्यांना शस्त्र पुरवणाऱ्या दोघांना पंजाबमधून अटक केली.

Web Title: Salman khan shooting accuseds suicide is a big conspiracy in state shiv senas thackeray faction leaders allegation nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2024 | 04:26 PM

Topics:  

  • salman khan house firing case
  • Thackeray Group

संबंधित बातम्या

BJP-Shivsena Alliance : “…तर मुंबईत उद्धव ठाकरेंना उमेदवार मिळणार नाहीत; चंद्रकांत पाटलांनी दिले युतीचे संकेत?
1

BJP-Shivsena Alliance : “…तर मुंबईत उद्धव ठाकरेंना उमेदवार मिळणार नाहीत; चंद्रकांत पाटलांनी दिले युतीचे संकेत?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.