Sambhaji Raje meets Chief Minister Uddhav Thackeray
मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. राज्यसभेचे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यसभेची टर्म संपल्यानंतर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील सर्व आमदारांना खुले पत्र लिहिले. यातच आता संभाजीराजे छत्रपती यांनी आता राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे(Sambhaji Raje meets Chief Minister Uddhav Thackeray).
संभाजीराजे छत्रपती यांनी गुरूवारी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यामध्ये ३५ मिनिटे चर्चा झाली. ही चर्चा राज्यसभा निवडणुकीबाबत झाली की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर झाली, हे अद्याप स्पष्ट नाही. दरम्यान, या भेटीवर तर्क-वितर्क लावले जात आहेत.
राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्याला सर्व आमदारांनी पाठिंबा द्यावा, असे खुले पत्र संभाजीराजे छत्रपती यांनी लिहिले आहे. आपण अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निवडणुकीत सहावी जागा निवडून आणण्यासाठीचे पुरेसे संख्याबळ कोणत्याही एका राजकीय पक्षाकडे नाही. सर्व राजकीय पक्षांनी व अपक्ष आमदारांनी आपल्याला संधी द्यावी, असे पत्रात म्हटले आहे.
पहिल्या पसंतीच्या मतांच्या आधारे भाजपचे दोन, शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक खासदार नक्की निवडून येईल. प्रश्न सहाव्या जागेचा आहे. संभाजीराजे छत्रपती यांना या सहाव्या जागेसाठी पाठिंबा देण्यावरून भाजपत अंतर्गत सहमती नसल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
[read_also content=”लग्नानंतर वधू-वराने स्वत:ला पेटवून घेतलं आणि…. पाहा भयानक व्हिडिओ https://www.navarashtra.com/viral/bride-and-groom-set-themselves-on-fire-nrvk-280519.html”]
[read_also content=”‘येथे’ आजही धडधडते भगवान कृष्णाचे हृदय! वैज्ञानिकांनाही याचे रहस्य उमगले नाही https://www.navarashtra.com/viral/the-story-of-lord-jagannath-and-krishnas-heart-nrvk-280509.html”]
[read_also content=”एक महिला तब्बल 36 वर्षांपासून पुरुष म्हणून वावरली पण शेवटी… https://www.navarashtra.com/viral/woman-lives-in-the-guise-of-man-for-36-years-nrvk-280502.html”]