

बालकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन
भोजनाच्या मेनूवरूनही वाद वाढल्याची माहिती
महापौरांच्या दलनात बैठक झाली बैठकीत समेट घडवण्याचा प्रयत्न
Bal Mela Budget : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने बालदिनानिमित्त २८ नोव्हेंबर रोजी किल्ला उद्यानात आयोजित करण्यात येणाऱ्या बाल मेळाव्याला नियोजनातील वादाची किनार लागली आहे. या कार्यक्रमासाठी करण्यात येणारी ई-निविदा प्रक्रिया आणि भोजनाच्या मेनूवरून महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त सोनाली मगर आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापतींचे पती यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे साडेआठ लाख रुपयांच्या बजेटच्या या कार्यक्रमावरून प्रशासन आणि समितीमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून दरवर्षी बालकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा २८ नोव्हेंबर रोजी किल्ला उद्यानात बाल मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सुमारे साडेआठ लाख रुपयांचा निधी अपेक्षित असून, बालकांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमांसह भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. मात्र, कार्यक्रमाच्या प्रत्यक्ष नियोजनाला सुरुवात होताच प्रशासन आणि सभापतींच्या पतीमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे समजते.
कार्यक्रमासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याची खरेदी, भोजन व्यवस्था आणि इतर खर्चाची प्रक्रिया ई-निविदेद्वारे राबविण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. सार्वजनिक निधी खर्च करताना प्रशासकीय नियम आणि पारदर्शकता राखणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, २८ नोव्हेंबरला कार्यक्रम होणार असून अवघे दोन दिवस शिल्लक असताना ई-निविदा प्रक्रिया राबविण्याचा घाट कशासाठी, असा सवाल सभापतींच्या पतींकडून उपस्थित करण्यात आल्याचे समजते
याच मुद्द्यावरून सहाय्यक आयुक्त सोनाली मगर आणि सभापतींच्या पतीमध्ये वादाची ठिणगी पडली. निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण होणार का, कार्यक्रमाचे नियोजन कसे करायचे, यावरून दोन्ही बाजूंमध्ये चर्चा तापली. त्यातच भोजनाच्या मेनूवरूनही वाद वाढल्याची माहिती आहे. जेवणामध्ये कोणते पदार्थ असावेत, किती प्रकारचे पदार्थ द्यावेत आणि त्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे, यावरूनही मतभेद झाल्याचे समजते.
विशेष म्हणजे, बालकांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमासाठी साडेआठ लाख रुपयांची तरतूद असताना त्याचा विनियोग नेमका कसा होणार, खर्चाचे नियोजन कोणत्या पद्धतीने केले जाणार आणि निविदा प्रक्रियेतून पारदर्शकता कशी राखली जाणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
बालकांच्या आनंदासाठी आयोजित केलेल्या मेळाव्याचे नियोजन करण्याऐवजी अधिकारी आणि सभापतींच्या पतीमध्येच वाद रंगल्याने महापालिकेच्या वर्तुळात या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. आता कार्यक्रम वेळेत पार पडण्यासाठी प्रशासन आणि समितीमध्ये समन्वय कसा साधला जाणार, याकडे लक्ष लागले आहे. या घटनेनंतर महापौर विनायक कोंड्याल यांनी संबंधित अधिक अधिकारी आणि सभापती यांच्यात महापौरांच्या दलनात बैठक झाली बैठकीत समेट घडवण्याचा प्रयत्न केला असल्याचे समजते.
नगरसेवकाच्या कामांमध्ये पती देवांची लडबुळ का असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे महिला बालकल्याण सभापतीचे पतीदेव नेहमीच प्रशासकीय कारभारात हस्तक्षेप करत असल्याच्या तक्रारी वाढले आहे या संदर्भात महापौरांना विचारण्यात केले असता अधिकाऱ्यांचा गैरसमज झाला असा कोणताही वाद निर्माण झाला नसल्याचे सांगत या घटनेवर पांघरून घालण्याचा प्रयत्न महापौरांनी केला.
सभापतींच्या पती देवांना बोलण्याची पद्धत माहित नाही,महिला अधिकाऱ्यांची कसं बोलावं अत्यंत उरमट आणि अशिल भाषेमध्ये मगरुर भाषेमध्ये बोलतात यावरून एका महिला अधिकाऱ्यांना अवमान होईल असा पद्धतीने पद्धतीने ते वागतात. आता मी मागणार नाही त्यांच्या महापौरांनी समजवून त्यांच्या वागण्यामध्ये बदल घडवावा अन्यथा मी मागे हटणार नाही अशी भूमिका सहाय्यक आयुक्त मगर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.