Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samruddhi Highway Toll hike : समृद्धी महामार्गाचा प्रवास महागणार! प्रवाशांच्या खिशाला कात्री देत मोठी टोलवाढ

Samruddhi Highway Toll hike : नागपूर ते मुंबईच्या सुसाट प्रवासासाठी समृद्धी महामार्ग ओळखला जातो. राजधानी आणि उपराजधानीमधील दुवा असणाऱ्या महामार्गाची टोलवाढ करण्यात आली.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 21, 2025 | 03:19 PM
Samruddhi Highway Toll hike : समृद्धी महामार्गाचा प्रवास महागणार! प्रवाशांच्या खिशाला कात्री देत मोठी टोलवाढ
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : राज्यातील सर्वात चर्चेत असलेला महामार्ग हा समुद्धी महामार्ग आहे. नागपूर ते मुंबई या 701 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग आहे. हा प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांशी प्रकल्प आहे. याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यापूर्वीच समुद्धी महामार्गाचा प्रवास महागला आहे. टोलवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

समृद्धी महामार्गावर 19 टक्के दरवाढ

समृद्धी महामार्गतील पूर्ण रस्ता अद्याप झालेला नाही. 701 किलोमीटरच्या या पूर्ण मार्गावरील फक्त 625 किलोमीटरचा मार्ग सुरू झाला आहे. आता येत्या महिन्याभरात इगतपुरी ते आमने हा उर्वरित 76 किलोमीटरचा मार्ग सुरु होणार आहे. मात्र त्यापूर्वीच टोलवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ अर्थात एमएसआरडीसीने टोलवाढीचा निर्णय घेतला आहे. समृद्धी महामार्गावर 19 टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे समृद्धी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

तीन वर्षासाठी ही टोलवाढ

समृद्धी महामार्गावरील प्रवास महाग होणार आहे. एमएसआरडीसीने 19 टक्के दरवाढीचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 एप्रिलपासून हे नवीन दर लागू होणार आहेत. समृद्धी महामार्गात आता केलेली 19 टक्के दरवाढ ही तीन वर्ष स्थिर राहणार आहे. त्यानंतर पुन्हा आढावा घेऊन दरवाढ केली आहे. आता पुढील तीन वर्षासाठी म्हणजेच 31 मार्च 2028 पर्यंत हे दर लागू राहतील, अशी माहिती एमएसआरडीसीने दिली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

काय आहेत समृद्धी महामार्गाचे दर?

समृद्धी महामार्गाचे हे सुधारित दर हे एक एप्रिल 2025 ते 31 मार्च 2028 पर्यंत असणार आहेत. नागपूर ते इगतपुरीपर्यंत कार, हलकी मोटर यांना सध्या 1080 रुपयांचा टोल लागायचा मात्र नव्या दरानुसार 1,290 रुपये लागतील हलकी व्यावसायिक, मिनीबस सध्या 1745 टोल होतो. तो नवीन वरवाढीनुसार 2075 रुपये करण्यात आला. बस किंवा दोन आसनाच्या ट्रकासाठी आतापर्यंत 3655 रुपये लागत होते. आता नवीन दर 4355 रुपये असणार आहे. अति अवजड वाहनांना जुने दर 6980 होते. नवे दर 8315 रुपये असणार आहे.

पूर्ण मार्ग सुरु झाला नाही

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग टप्प्याटप्प्या पूर्ण करुन प्रवाशांना खुला करण्यात आला. यामध्ये 11 डिसेंबर 2022 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर ते शिर्डी दरम्यान 520 किमी एक्सप्रेस वेचे उद्घाटन केले होते. नंतर, 23 मे 2023 ला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी ते भरवीर असा 105 किमीचा मार्ग खुला केला. त्यानंतर 4 मार्च 2024 रोजी आणखी 25 किमी (भरवीर ते इगतपुरी दरम्यानचा) मार्ग वाहनचालकांसाठी खुला करण्यात आला. आता शेवटचा 76 किमीचा रस्ता बाकी आहे. हा भिवंडी-इगतपुरी रस्ता आहे. याचे काम सुरु असून तो अद्याप सुरु होणे बाकी आहे.

Web Title: Samruddhi highway toll hike by 19 percentage for three years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2025 | 03:16 PM

Topics:  

  • Samruddhi Highway

संबंधित बातम्या

मोठी बातमी! महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण 2025 जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय
1

मोठी बातमी! महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण 2025 जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय

समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; भरधाव कार तीनवेळा झाली पलटी, व्यावसायिकाचा मृत्यू
2

समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; भरधाव कार तीनवेळा झाली पलटी, व्यावसायिकाचा मृत्यू

Samruddhi Highway : एकनाथ शिंदेंनी घेतलं हातात स्टेरिंग; समृद्धी महामार्गावरुन महायुतीची गाडी सुसाट
3

Samruddhi Highway : एकनाथ शिंदेंनी घेतलं हातात स्टेरिंग; समृद्धी महामार्गावरुन महायुतीची गाडी सुसाट

Devendra Fadnavis: आता प्रवास सुरक्षित होणार! महाराष्ट्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णया
4

Devendra Fadnavis: आता प्रवास सुरक्षित होणार! महाराष्ट्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.