sanjay Nirupam target shivsena uddhav thackeray
मुंबई : राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये नेत्यांनी केलेल्या टीकांवरुन जोरदार राजकारण रंगले आहे. नेत्यांमध्ये वक्तव्यांवरुन खडाजंगी सुरु आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्यावरुन त्यांना निलंबित करण्यात आले. अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कौतुक आणि उदात्तीकरण केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे. यावर आता शिंदे गटाचे नेते व माजी खासदार संजय निरुपम यांनी टीका केली आहे.
यापूर्वी राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेना आणि समाजवादी पक्षाची युती होती. मात्र आता ही युती तुटली असून सत्ताधारी महायुतीने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. अबू आझमी यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया द्यावी अशी मागणी संजय निरुपम यांनी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
माजी खासदार संजय निरुपण यांनी अबू आझमी प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय निरुपण म्हणाले की, सर्वप्रथम, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हे मान्य करावे की अबू असीम आझमी हे महाविकास आघाडीचा भाग आहेत. जेव्हा आझमी यांनी निवडणूक लढवली तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिला होता, आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतः शाल देऊन त्यांचे स्वागत केले. जर आपण एकनाथ शिंदेंबद्दल बोलत असू, तर जर कोणी विरोधी पक्षातून असेल तर त्यांना भेटण्यात काहीच गैर नाही. एका कार्यक्रमात टेबलावर बसलो होतो. पण याचा अर्थ असा नाही की आपण त्याला विरोध करणार नाही, उद्धव ठाकरेंची शिवसेना अबू असीम आझमी यांचा उघडपणे निषेध करू शकत नाही. कारण जर त्यांनी निषेध केला तर त्यांच्या मुस्लिम मतांना बाधा येईल, असे स्पष्ट संजय निरुपम यांनी म्हटलं आहे.
शिंदे गटाचे नेते संजय निरुपम पुढे म्हणाले की, “मुंबई काँग्रेस कार्यालयाला लवकरच टाळे लागणार आहे. पी. डब्ल्यू. डी. आवारात असलेल्या काँग्रेस कार्यालयाचे 18 लाख भाडे सरकारला दिलेले नाही. मागील अनेक महिन्याचे वीज बिल न भरल्यामुळे वीज कंपनीने मीटर काढून नेले आहे. काँग्रेस कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहा महिंन्यापासून पगार नाही. शिवसेना ठाकरे गटासोबत युती केल्यामुळे काँग्रेस संपली,” असे देखील संजय निरुपम म्हणाले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे बोलताना ते म्हणाले की, मुंबईत फक्त तीन आमदार निवडून आलेत तेही मुस्लिम मतांमुळेच निवडून आले आहेत. काँग्रेसचे नेते काल मुंबईत यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवण्यासाठी आले होते असं म्हणत त्यांनी यावेळी राहुल गांधी यांना देखील टोला लगावला आहे. अनेक मुस्लिम आता शिवसेना ठाकरे गटाकडे गेले आहेत. मल्लिकार्जुन खरगे प्रचंड जातीवादी असून वेणुगोपाल देखील अकार्यक्षम आहेत. कॉंग्रेसच्या कार्यालयाला कुलूप लागणार आहे, असा घणाघातही यावेळी संजय निरुपम यांनी केला आहे.