112 crore Scam in Yashwant Cooperative Bank: यशवंत को-ऑपरेटीव्ह बँकेत तब्बल ११२ कोटी १० लाख रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचे समोर आले असून, या प्रकरणाने सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घोटाळ्याप्रकरणी शनिवारी रात्री कराड शहर पोलीस ठाण्यात ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोप sheet मध्ये भाजप नेते आणि सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर, तसेच फलटणचे माजी आमदार दिवंगत कृष्णचंद्र भोईटे यांचा मुलगा नरेंद्र भोईटे यांची नावे समोर आली आहेत.
या प्रकरणाचा तपास सुरू असून, बँकेतील निधी गैरव्यवहाराने वळविण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मोठ्या रकमेचा हा घोटाळा उघड झाल्यानंतर सातारा आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पुण्यातील शासकीय सनदी लेखापाल मंदार देशपांडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार, यशवंत को-ऑपरेटीव्ह बँकेत संगनमताने कट रचून बोगस कर्जांच्या माध्यमातून ₹११२ कोटी १० लाख ५७ हजार रुपयांचा अपहार करण्यात आला. एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत झालेल्या लेखापरीक्षणात हा घोटाळा उघड झाला असून, १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२४ या लेखापरीक्षणपूर्व कालावधीत कार्यरत असलेल्यांवरही गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेतील निधीचा गैरव्यवहार करून मोठ्या प्रमाणावर रक्कम वळविण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, मोठ्या आर्थिक गैरव्यवहारामुळे सातारा परिसरात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणात यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील तब्बल ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मुख्य आरोपींपैकी काही प्रमुख नावे पुढीलप्रमाणे आहेत.
शेखर चरेगावकर – बँकेचे तत्कालीन अध्यक्ष व भाजप नेते
नरेंद्र भोईटे, रवींद्र टोणपे, चंद्रकांत चव्हाण, अनिल चव्हाण, सुनील पावसकर, सुधीर कुलकर्णी, श्रीकृष्ण जोशी, अवधूत नाटेकर, डॉ. नचिकेत वाचासुंदर, चंद्रकांत कुलकर्णी, गणपतराव निकम, नानासो पवार, पांडुरंग करपे, नितीन रेडेकर, स्नेहन कुलकर्णी, कल्पना गुणे, लक्ष्मण सपाटे, महेशकुमार जाधव, अजित निकम, नानासाहेब पवार, गोपीनाथ कुलकर्णी, संदीप इंगळे, जयवंत जगदाळे, डॉ. प्रदीपकुमार शिंदे, प्रसाद देशपांडे, सुहास हिरेमठ, परशुराम जंगाणी, अनघा कुलकर्णी, विशाल शेजवळ, प्रमोद गिजरे, वसंतराव बोराटे, सुनील मुंद्रावळे, नीलिमा कुलकर्णी, रेखा कुलकर्णी, सचिन साळुंखे — त्यावेळचे संचालक
तसेच,
संतोष देसाई – तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी
धनंजय डोईफोडे, वैशाली मोकाशी, वैशाली पावशे (शाखा व्यवस्थापक), केशव कुलकर्णी
शेखर चरेगावकर यांचे भाऊ शार्दूल उर्फ मुकुंद चरेगावकर,
तसेच विठ्ठल उर्फ शौनक कुलकर्णी, राही कुलकर्णी, संहिता कुलकर्णी, वैभव कुलकर्णी, काशिनाथ कुलकर्णी, सूरज गायधनी, विभिषण सोनावणे, दिनेश नवळे
या सर्वांविरुद्ध कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.