पुण्याजवळील खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) मध्ये एका १८ वर्षीय कॅडेटचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृत्य झालेल्या तरुणाचे नाव पहिला टर्म कॅडेट अंत्रीक्ष कुमार सिंग असे असून तो मूळचा लखनऊ, उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे. त्याचा मृतदेह शुक्रवारी पहाटे हॉस्टेलमधील आपल्या खोलीत मृतावस्थेत आढळला. या घटनेनंतर मृत कॅडेटच्या कुटुंबीयांनी थेट रॅगिंगचा आरोप केला आहे. यामुळे या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. ही घटना अतिशय गंभीर असून संपूर्ण राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये याचे पडसाद उमटले आहेत.
काय घडलं नेमकं?
सकाळी राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये नियमित प्रशिक्षण होत असे. मात्र शुक्रवारी अंत्रीक्ष प्रशिक्षणासाठी गैरहजर होता. त्यामुळे त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला शोधले. तेव्हा तो खोलीत बेडशीटला लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्याला तातडीने खडकवासला येथील लष्करी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. उत्तम नगर पोलिसांनी या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे. कोणतीही सुसाईड नोट न सापडल्याने मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र प्राथमिक तपासात पोलिसांनी आत्महत्येचा संशय व्यक्त केला आहे.
कुटुंबीयांनी केला गंभीर आरोप
त्याच्या कुटुंबीयांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहे. त्याच्या कुटुंबीयांचा म्हणणं आहे, मागील काही दिवसांपासून सिनियर कॅडेट्सकडून अंत्रीक्षला खूप त्रास दिला जात होता. आम्ही ही बाब अकादमीच्या अधिकाऱ्यांच्या निर्दशनास आणून दिली होती. पण दुर्लक्ष झाले. हा छळ असह्य झाल्यानेच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. असा आरोप त्यांनी केला आहे. हा रॅगिंगचाच प्रकार आहे. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे अश्या भावना त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केल्या आहेत. कुटुंबीयांनी पुणे पोलिसांकडेही आपला जबाब नोंदवला आहे.
पोलिसांची भूमिका काय ?
पुणे पोलिसांनी या प्रकरणाची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे. शिवाय आम्ही याचा सखोल तपास सुरू केला आहे. शवविच्छेदन अहवाल आणि सर्व बाजूंच्या चौकशीनंतरच मृत्यूच्या नेमक्या कारणाबद्दल भाष्य करता येईल असं पोलीसंनी सांगितलं आहे. रॅगिंगच्या आरोपाची अद्याप पुष्टी झालेली नाही असं ही पोलीसांनी स्पष्ट केले आहे.
NDA ची भूमिका काय?
एनडीए प्रशासनाने या दुःखद घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अकादमीने एका अधिकृत निवेदनात, घटनेमागील परिस्थितीचा पूर्ण तपास करण्यासाठी ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’ (Court of Inquiry) करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलीस आणि एनडीएची ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’ अशा दोन्ही स्तरांवर या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
दारु पिण्याच्या कारणावरुन वाद, जाब विचारायला दोघे घरी गेले अन् पुढे घडलं भयानक