Sharad Pawar
बारामती : मला वयाच्या २६ व्या वर्षी निवडणूक लढवण्याची संधी मिळाली, त्यावेळी माझा प्रचार तरुण पिढीने सायकलवर केला. त्या निवडणुकीत ७० हजार मताधिक्याने माझा विजय झाला, अशा जुन्या आठवणींना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसमोर उजाळा दिला.
पहिल्या निवडणुकीच्या विजयाचा प्रसंग कथन
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोमवारी (दि ११) सायंकाळी बारामती शहरातील पक्ष कार्यालयाला भेट दिली. यावेळी पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी पहिल्या निवडणुकीच्या विजयाचा प्रसंग कथन केला.
२६ व्या वर्षी निवडणूक लढण्याची संधी
यावेळी पवार म्हणाले, २६ व्या वर्षी निवडणूक लढण्याची संधी मला वयाच्या २६ व्या वर्षी निवडणूक लढण्याची संधी मिळाल्यानंतर त्यावेळी माझ्याविरोधात एका साखर कारखान्याचे अध्यक्ष होते. मात्र, त्यावेळी हा तरुण मुलगा कारखान्याच्या चेअरमनला कसा टक्कर देईल, पण मी सभेत चक्कर टाकल्यानंतर माझी निवडणूक ही माझी राहिलीच नाही.
संपूर्ण निवडणूक तरुण पिढीने हातात घेतली. सायकलवर माझा प्रचार केला. समाजातील लहान घटकाने ही निवडणूक हातात घेतली आणि सत्तर हजार मतांनी मला निवडून दिले. आतापर्यंत जी निवडणूक झाली, त्या निवडणुकीत बारामती आणि महाराष्ट्राने मला मागे पाहायला लावलेले नाही.
बारामतीकरांमुळे राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री पद
प्रत्येक निवडणुकीत मला सहकार्य केले. मी कधी प्रचाराला येत नसे, तुमच्यापैकी काहींना आठवत असेल माझी शेवटची सभा मिशन हायस्कूल जवळ झाली होती. यातून मला महाराष्ट्राचे शासन, समाजकारण चालवण्याची संधी मला मिळाली. यातून मला बारामतीकरांमुळे राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री पद, देशांचे संरक्षण मंत्री पद, दहा वर्षे कृषिमंत्री पद असे अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी मला बारामतीकरांमुळेच मिळाली.
खासदाराला तुम्हाला पुन्हा एकदा संधी द्यायची
आताच्या तुमच्या खासदार शातील ५१८ खासदरापैकी त्यांचा पहिल्या तीनमध्ये क्रमांक आहे. शिवाय संसदेत ९८ टक्के हजेरी आहे. त्यामुळे अशा खासदाराला तुम्हाला पुन्हा एकदा संधी द्यायची आहे, मला विश्वास आहे ,ती संधी तुम्ही पुन्हा एकदा द्याल.यावेळी चित्र वेगळं आहे ,पण त्याची चिंता करायचे कारण नाही.ज्यांना पदे मिळाली ते इथे नाहीत.पण ज्यांच्या मुळे पद मिळाली ते सगळे इथं असल्याचे पवार यांनी नमूद केले.
दरम्यान, यावेळी अॅड संदीप गुजर,सत्यव्रत काळे,वनिता बनकर यांनी पवार यांचे स्वागत केले.पक्षाच्या नुतन कार्यालयात पवार आज प्रथमच आले होते. पवार यांचे कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचा बुलंद आवाज ! शरद पवार!! शरदपवार!!!,‘पवारसाहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशी घोषणाबाजी सुरू केली.