शरद पवार यांच्याकडून मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचे निमंत्रण; राजकीय चर्चांना उधाण, वाचा सविस्तर
राज्यात राजकीय उलथा-पालथ झाल्याचे पाहायला मिळाल्यानंतर मोठ मोठ्या घटना सातत्याने सुरु असताना आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जेवणाचं निमंत्रण देण्यात आले आहे.
पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जेवणाचं निमंत्रण देण्यात आलेले होते.
बारामती येथे जेवणाच्या कार्यक्रमासाठी त्यांना निमंत्रण देण्यात आलेले असून, महायुतीच्या कार्यक्रम पत्रिकेत नाव नसले तरीही ‘शरद पवार नमो महा रोजगार’ मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. ते प्रेक्षकांमध्ये बसून कार्यक्रम ऐकणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, गोविंद बागेमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसाठी जेवणाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे. त्याआधी विद्या प्रतिष्ठाणच्या तीने संस्थेच्या आवारात आणि संस्थेच्या कार्यालयात सत्कार कार्यक्रम होऊ शकतो.
२ मार्च रोजी बारामतीमध्ये नमो रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. शासकीय कार्यक्रम पत्रिकेत शरद पवारांचं नाव नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
Web Title: Sharad pawar invites cm eknath shinde and two deputy cm to dinner read more about political discussions nryb