बीड : आज शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या स्वाभिनान यात्रेमध्ये बीड येथील सभेत बीडच्या जनतेचे कौतुक करीत जनतेच्या निष्ठेची आठवण करून देत जनतेने कशा पद्धतीने यशवंतरावांच्या काळात केशरकाकू निष्ठेने आमच्या सोबत उभ्या राहत यश प्राप्त केले. आज त्याचीच पुनरावृत्ती करीत त्यांनी त्यांच्या नातूने आमच्या बाजूने उभे राहून निष्ठेची पुनरावृत्ती दाखवली आहे. यावेळी त्यांनी बीडच्या जनतेचे कौतुक करीत असताना, ही जनता नेहमी निष्ठेच्या बाजूने उभी राहते.
संदीप क्षीरसागर यांचे कौतुक
संदीप क्षीरसागर यांच्या नियोजनाने हा सोहळा आयोजित केला. मला जुन्या काळाची आठवण झाली. जु्न्या काळाची आठवण निष्ठेबाबत बीडची जनता त्यांच्यामागे उभी राहते. मी महाराष्ट्रातील सरकारमध्ये होतो. महाराष्ट्राचे नेतृत्व यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने काम करीत होतो. खऱ्या नेतृत्वापेक्षा एक वेगळी भूमिका मांडायला सुरुवात केली. केशरकाकूंनी आपली भूमिका त्या काळात भूमिका स्पष्ट करीत निष्ठेच्या बाबतीत आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही.
मणिपूर हा भारताच्या उत्तरेचा भाग, अरुणाचल प्रदेश, नॉर्थ इंडियाबाबत सांगायचे सोडून, मणिपूरच्या सीमा सर्व आजूबाजूच्या देशांना लागली. दोन समाजात तेढ, हिंसाचार होत असताना, भाजपचे सरकार यावर काही भूमिका घेत नाही. जात, धर्म आणि भाषा यातून तेढ कशी निर्माण होईल याची खबरदारी आताचे सत्ताधारी घेत असल्याचे पाहायला मिळाले.
समाजाला शांत करण्याची गरज होती, पंतप्रधान फक्त 3 मिनिटे बोलले, अशी स्थिती अनेक राज्यांत असताना, त्याच्यावर काम करायचे सोडून
कर्नाटकला सरकार पाडले, मध्य प्रदेशमध्ये सरकार पाडले, महाराष्ट्रात पाडले, तुम्ही स्थिर सरकार देण्याची भूमिका बोलता आणि राज्यातील सरकारे पाडता.
आज या ठिकाणी जितेंद्र आव्हाडांच्या शहरात शासकीय रुग्णालयात दोन दिवसांत 18 जणांचा मृत्यू होतो. हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे हे सरकार कुठे चालले आहे. आमच्याबरोबर असणारे काही सहकारी, वेगळी भूमिका घेत,
सत्तेतील नेत्यांना तुरुंगात टाकण्याचे काम चालू आहे.
आज सत्तेचा गैरवापर करून लोकांना तुरुंगात डांबून सत्तापालट करण्याचा या सरकार वापर करतात. आमचा सहकारी पक्ष सोडून गेला. अमरसिंह पंडितांनी सांगितले, पवार साहेबांचे वय झाले आपल्याला आपल्या भवितव्याचा विचार केला पाहिजे. तुम्ही माझे वय झाले म्हणता, तुम्ही माझे काय बघितले आहे. अशा लोकांना सत्तेतून बाहेर काढण्याचे काम यापूर्वी आम्ही केले आहे. आम्ही अनेकांचे पराभव केले आहेत. येथील तरुण पिढीच्या मदतीने आम्ही सत्तापालट येथे करून दाखवला आहे. सत्तेच्या बाजूने जायचे जा, आय़ुष्यातून तुम्ही ज्यांच्याकडून घेतले असेल तर त्याची जाणीव ठेवा, माणुसकी ठेवा, नाहीतर लोकं तुम्हाला जागा दाखवतील.
या जिल्ह्याचा मतदार खूप सूज्ञ आहे, तु्म्हाला तुमची जागा दाखवेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, मी पुन्हा येईन! ते पुन्हा आले परंतु, त्यापदावर आले तुम्ही याबाबत मी पुन्हा येईन, महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते त्यांनी घोषणा केली होती, मी पुन्हा येईन! माझे पंतप्रधानांना सांगणे आहे, तुम्ही याबाबतीत त्यांचे मार्गदर्शन करा.