Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्रेकींग! पुण्यात शरद पवार कार्यकर्त्यांना करणार संबोधन; बैठकीपूर्वी लोकसभेच्या जागांवरून जयंत पाटलांनी केली मोठा खुलासा

आज पुण्यातून शरद पवार कार्यकर्त्यांना संबोधन करणार आहेत. तसेच, ते पत्रकार परिषद घेणार आहेत. आज प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. बैठकीपूर्वीच जयंत पाटील यांनी लोकसभेच्या जागांवरून मोठा खुलासा केला आहे. लोकसभा निवडणुकीला अवघे चार ते पाच महिने बाकी आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळेच शरद पवार गटाची ही महत्त्वाची बैठक मानली जात आहे. 

  • By युवराज भगत
Updated On: Dec 02, 2023 | 03:45 PM
Sharad Pawar group meeting Big revelation of Jayant Patil

Sharad Pawar group meeting Big revelation of Jayant Patil

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभेच्या कोणत्या चार जागा लढवणार याची माहिती दिली. त्यावर शरद पवार गटाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच महाविकास आघाडीत शरद पवार गट किती जागा लढवणार याची माहितीही दिली आहे.

ठाकरे गट सर्वाधिक जागा लढवणार

महाविकास आघाडीचं लोकसभेचं जागा वाटप जवळपास ठरलं आहे. काही जागांवर सामंजस्याने तोडगा काढण्यात येणार आहे. तर काही जागा मित्रपक्षांसाठी सोडण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट सर्वाधिक जागा लढवणार आहे. तर शरद पवार गटालाही अधिक जागा मिळाल्याची माहिती आहे. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचा गट किती जागा लढवणार याचा आकडाच सांगून टाकला आहे. तसेच काही मतदारसंघांची नावेही सांगितली आहेत.

शरद पवार गट लोकसभेच्या 14 ते 15 जागा लढवणार

राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही मोठी बातमी दिली आहे. शरद पवार गट लोकसभेच्या 14 ते 15 जागा लढवणार आहे. यात अमरावती, भंडारा, बारामती, सातारा, शिरूर, रायगड, रावेर, दिंडोरी या मतदारसंघाचा समावेश आहे. काही मतदारसंघात आपण उमेदवार बदलणार आहोत. मार्च, एप्रिलला लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी आमची तयारी झाली आहे, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. तसेच लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेशही जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.

राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच बारामती, शिरूर, रायगड आणि सातारा या चार लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचं सांगितलं होतं. या मतदारसंघात जीवाचं रान करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज जयंत पाटील यांनी शरद पवार गट जे मतदारसंघ लढणार असल्याचं सांगितलं त्यात बारामती, सातारा, शिरूर आणि रायगडचाही समावेश आहे. म्हणजे या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजितदादा गट उमेदवार देणार असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या दोन्ही मतदारसंघातील लढत चुरशीची होणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

लढवणार की लढल्याचं दाखवणार?
अजितदादा यांनी त्यांच्या गटाच्या जागा जाहीर केल्या आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. त्यांचा पक्ष वेगळा झालेला आहे, त्यांना काही जागा लढवाव्य लागतील. काही मतदारसंघात लढवतील ते. पण ते खरंच लढवणार की लढवल्यासारखं दाखवणार हे बघायचय, असा टोला त्यांनी लगावला.

Web Title: Sharad pawar will address workers in pune jayant patil made a big revelation from lok sabha 2024 seats nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2023 | 03:42 PM

Topics:  

  • Deputy CM Ajit Pawar
  • Sharad Pawar Group

संबंधित बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मोखाडा तालुका कार्यकारिणी बरखास्त, नवीन चेहरे पुढे करत नेमणूक होणार?
1

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मोखाडा तालुका कार्यकारिणी बरखास्त, नवीन चेहरे पुढे करत नेमणूक होणार?

Eknath Khadse : नाथाभाऊ पवारांची साथ सोडणार, चर्चांना उधाण; एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
2

Eknath Khadse : नाथाभाऊ पवारांची साथ सोडणार, चर्चांना उधाण; एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.