Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कचोरी प्रेमींसाठी आंनदाची बातमी! शेगावची प्रसिद्ध कचोरी आता मिळणार रेल्वेतही, “रेल्वे कोच रेस्टॉरंट” मध्ये बसुन घ्या आस्वाद

1950 सालापासून शेगावची ही प्रसिद्ध कचोरी रेल्वेत मिळत असे पण गेल्या दहा ते बारा वर्षापासून रेल्वेत ही कचोरी विकण्यास मनाई झाली होती. मात्र हीच कचोरी नवीन ग्लॅमरस रुपात तुम्हाला मिळणार आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 28, 2023 | 09:13 AM
कचोरी प्रेमींसाठी आंनदाची बातमी! शेगावची प्रसिद्ध कचोरी आता मिळणार रेल्वेतही, “रेल्वे कोच रेस्टॉरंट” मध्ये बसुन घ्या आस्वाद
Follow Us
Follow Us:

बुलढाणा: शेगावची कचोरी..! फक्त नाव ही घेतलं की तोंडाला पाणी सुटते… ! या कचोरीने साता समुद्रापार सुद्धा प्रसिद्धी मिळवलेली आहे. शेगावची जगप्रसिद्ध कचोरी आता तुम्हाला रेल्वेतही मिळणार आहे. रेल्वे विभागाच्या IRCTC विभागाने आता शेगाव रेल्वे स्थानकात एक रेल्वे कोच चक्क रेस्टॉरंट म्हणून बनवला आहे. या रेस्टॉरंटमध्ये आता लवकरच शेगावची सुप्रसिद्ध असलेली कचोरीचा आस्वाद आता तुम्हाला चोवीस तास घेता येणार आहे.

मध्य रेल्वेचे शेगाव स्टेशन… संत गजानन महाराजांची समाधी स्थळ शेगावातच आहे. शेगाव येथे दुसरी प्रसिद्ध गोष्टी म्हणजे येथील खुसखुशीत आणि चावदार कचोरी… असे सांगितले जात की 1950 मध्ये देशाची फाळणी झाली त्यावेळी पाकिस्तानात असलेल्या पंजाबमधून एक गृहस्थ शेगावात आले. तिरथराम करमचंद शर्मा असे त्यांचे नाव होते. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी तेव्हा शेगाव रेल्वे स्थानकात काचोरी विकण्याच काम सुरू केलं. आज हीच कचोरी प्रसिद्ध झाली ती आपल्या चवीने…! आता त्यांची तिसरी पिढी या कचोरीचा व्यवसाय करत आहे. नाव मात्र टी.आर.शर्मा हेच आहे. त्यांचे अनेक वंशज शेगावात आज काचोरीचा व्यवसाय करतात.

1950 सालापासून शेगावची ही प्रसिद्ध कचोरी रेल्वेत मिळत असे पण गेल्या दहा ते बारा वर्षापासून रेल्वेत ही कचोरी विकण्यास मनाई झाली होती. मात्र आता हीच कचोरी नवीन ग्लॅमरस रुपात तुम्हाला मिळणार आहे. ती म्हणजे शेगाव रेल्वे स्थानकात नवीन सुरू होत असलेल्या “रेल्वे कोच रेस्टॉरंट” मध्ये….! येत्या 1 मे रोजी या रेल्वे कोच रेस्टॉरंटचे उद्घाटन होणार असून हा वातानुकूलित रेल्वे कोच नुसता कोच नसून यात शेगावच्या कचोरीसोबत अस्सल वऱ्हाडी जेवणही मिळणार आहे. ही सेवा 24 तास सुरू असणार आहे. रेल्वेने सुरू केलेल्या या कोच रेस्टॉरंटमुळे शेगावात येणारे व कचोरी प्रेमी भाविकही खुश आहेत. बाहेरून जरी हा रेल्वेचा डबा वाटत असला तरी मात्र आतून ही एक रेस्टॉरंट असून सर्व सुविधा या कोच रेस्टॉरंट मध्ये आहेत. त्यामुळे आगामी काळात लवकरच या रेल्वेच्या डब्यातील वातानुकूलित रेस्टॉरंट मध्ये बसून तुम्हाला शेगावची प्रसिद्ध कचोरी चाखायला मिळणार आहे.

कचोरी बुलढाणा जिल्ह्याची नवी ओळख
शेगावला दरवर्षी हजारो भाविक गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येतात. समाधी दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला या कचोरीने भुरळ घातली आहे. शेगावच्या रेल्वे स्टेशनवर उतरताच खमंग कचोरी खाण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. येथे येणारा प्रत्येक जण कचोरीच्या लज्जतदारपणामुळे ती आपल्या गावी नेण्याचा मोह आवरू शकत नाहीत. लोणारचं सरोवर, जिजाऊंचं जन्मस्थळ सिंदखेड, गजानन महाराजांचं शेगाव यानंतर ही कचोरी आता बुलढाणा जिल्ह्याची नवी ओळख बनली आहे.

Web Title: Shegaon kachori will be avikabale in train now railway has started railway coach restaurant in buldana railway station nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2023 | 09:13 AM

Topics:  

  • Shegaon Kachori

संबंधित बातम्या

गजानन महाराजांची पालखी आज पंढरपूरकडे रवाना; ७०० वारकरी १,३०० किमींची पायी वारी करणार
1

गजानन महाराजांची पालखी आज पंढरपूरकडे रवाना; ७०० वारकरी १,३०० किमींची पायी वारी करणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.