शिंदे सरकारमधील डच्चू दिलेले ते १२ मंत्री कोणते?, 4 जण तर महाराष्ट्रातील बडे नेते
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील महायुती सरकारचा काल शपथविधी पार पडला. नागपूरच्या राजभवनात ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यात भाजपच्या १९, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या ११ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ९ मंत्र्याचा समावेळ आहे. मात्र यावेळी फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात शिंदेच्या मंत्रिमंडळातील १२ मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. त्यात तिन्ही पक्षाती बड्या नेत्यांचा समावेश आहे. यातील काही नेत्यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली.
भाजपमध्ये वरिष्ठ नेते आणि मंत्री राहिलेल्या सुधीर मुनगंटीवर आणि रविंद्र चव्हाण यांना मंत्रिपदातून वगळण्यात आलं आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासारख्या बड्या नेत्यांना मंत्रिपद नाकारलं आहे. शिंदेंच्या शिवसेनेतही दीपक केसरकर व तानाजी सावंत यांसारख्या नेत्यांना मंत्रिपद देण्यात आलं नाही.
सुधीर मुनगंटीवार (भाजप), छगन भुजबळ (अजित पवार गट), दीपक केसरकर (शिंदे गट), दिलीप वळसे पाटील (अजित पवार गट), धर्मरावबाबा आत्राम (अजित पवार गट), अनिल भाईदास पाटील (अजित पवार गट) आणि संजय बनसोडे (अजित पवार गट), रवींद्र चव्हाण, सुरेश खाडे (भाजप), डॉ. विजयकुमार गावित (भाजप) आणि तानाजी सावंत (शिंदे गट), अब्दुल सत्तार (शिंदे गट) यांचा समावेश आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. काल ते नागपूरला जाण्यासाठी निघाले होते, मात्र मंत्रिपदासाठी फोन आला नाही, त्यामुळे त्यांची घोर निराशा झाली. दरम्यान त्यांनी यावरून उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. जरांगेंना अंगावर घेतल्याचं बक्षीस मला मिळालंय, असं म्हणत छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळात संधी न दिल्याबद्दल आपली भूमिका मांडली. दरम्यान, छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठविण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
अजित पवार, उपमुख्यमंत्री
चंद्रशेखर बावनुकळे (भाजप)
आशिष शेलार (भाजप)
राधकृष्ण विखे (भाजप)
जयकुमार रावल (भाजप)
पंकजा मुंडे (भाजप)
अतुल सावे (भाजप)
अशोक उईके(भाजप)
गणेश नाईक (भाजप)
मंगलप्रभात लोढा (भाजप)
शिवेंद्रसिंहराजे भोसले (भाजप)
चंद्रकांत पाटील (भाजप)
गिरीश महाजन (भाजप)
जयकुमार गोरे (भाजप)
संजय सावकरे (भाजप)
नितेश राणे (भाजप)
आकाश फुंडकर (भाजप)
माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी काँग्रेस)
हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी काँग्रेस)
नरहळी झिरवाळ (राष्ट्रवादी काँग्रेस)
मकरंद पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
दत्ता भरणे (राष्ट्रवादी काँग्रेस)
आदिती तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
धनजय मुंडे (राष्ट्रवादी काँग्रेस)
दादा भुसे (शिवसेना)
संजय राठोड (शिवसेना)
उदय सामंत (शिवसेना)
शंभूराजे देसाई (शिवसेना)
गुलाबराव पाटील (शिवसेना)
संजय शिरसाट (शिवसेना)
प्रताप सरनाईक (शिवसेना)
भरत गोगावले (शिवसेना)
प्रकाश अबिटकर (शिवसेना)
मेघना बोर्डीकर (भाजप)
पंकज भोयर (भाजप)
माधुरी मिसाळ (भाजप)
योगेश कदम (शिवसेना)
इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस)
आशिष जैयस्वाल (शिवसेना)