ladki bahin yojana last form fill date
मुंबई : राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. यंदाच्या वार्षिक अर्थसंकल्पामध्ये ही योजना जाहीर करण्यात आली. अवघ्या काही काळातच ही योजना अत्यंत लोकप्रिय झाली. कोट्यवधी महिलांनी या योजनेचे अर्ज दाखल केले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत नवीन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. याबाबत जीआर काढण्यात आला असून महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर तो शेअर केला आहे.
जुलै महिन्यामध्ये महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. त्यावेळी जुलै महिन्यांपर्यंतच फॉर्म भरण्याची मुदत होती. मात्र त्यानंतर लोकांची अडचण आणि तांत्रिक बाब लक्षात घेत योजनेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली. त्यावेळेस ही वाढ 31 ऑगस्टपर्यंत करण्यता आली होती. ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधनाच्यापूर्वी लाखो महिलांच्या खात्यामध्ये योजनेचे पहिल्या दोन महिन्यांचे हफ्ते देखील दाखल झाले. यानंतर आता काही महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून महिला वर्गाला दिलासा देणारा शासन निर्णय काढण्यात आला. अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ करण्यात आली आहे.
महिला सक्षमीकरणाची क्रांती यापुढेही सुरूच राहणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना – योजनेसाठी नावनोंदणी सप्टेंबर महिन्यातही सुरू राहणार.
– ज्या महिला भगिनींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नावनोंदणी केली नसेल त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी. बदलाचे साक्षीदार नव्हे..… pic.twitter.com/t5TexKO4Vo — Aditi S Tatkare (@iAditiTatkare) September 2, 2024
मंत्री अदिती तटकरे यांनी शासन निर्णय जाहीर करत महिला वर्गाला अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले आहे. लाडकी बहीण योजनेच्या अर्ज दाखल करण्यासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत वाढ दिली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करता येणार आहे. अदिती तटकरे यांनी पोस्ट करताना लिहिले आहे की, “महिला सक्षमीकरणाची क्रांती यापुढेही सुरूच राहणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नावनोंदणी सप्टेंबर महिन्यातही सुरू राहणार. ज्या महिला भगिनींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नावनोंदणी केली नसेल त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी. बदलाचे साक्षीदार नव्हे.. शिल्पकार व्हा… मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहभागी व्हा !” अशी पोस्ट मंत्री अदिती तटकरे यांनी केली आहे. त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरायचा राहिला आहे तर महिला वर्गाला सप्टेंबर महिन्यामध्ये देखील भरता येणार आहे.