shinde vs ubt now second innings begins uddhav balasaheb thackeray and shinde camp will face each other chances of rada in the bmc nrvb
मुंबई : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर (ECI Descision) शिंदे गटाला (Shinde Camp) शिवसेना नाव (Shivsena Name) आणि धनुष्यबाण चिन्ह (Bow And Arrow Symbol) मिळाले. त्यानंतर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले (Pratod Bharat Gogawle of Shinde Camp) यांच्यासह काही आमदार विधीमंडळात दाखल झाले आणि विधानभवनातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा घेतला आणि हा ताबा घेतल्यानंतर मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे कार्यालयावर ताबा घेण्याच्या शक्यतेमुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक महापालिका कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला. त्याचवेळी शिंदे गटाचे कोणी नगरसेवक किंवा पदाधिकारी महापालिकेत येऊन कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार असतील तर आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना उत्तर देऊ असा इशारा यावेळी ठाकरे गटाकडून देण्यात आला. त्यामुळे आता दोन्ही गटात वाद रंगणार आहेत.
शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात महापालिकेतील पक्ष कार्यालयावरून झालेल्या राड्यानंतर पालिका आयुक्तांनी सर्वच महापालिका मुख्यालयातील पक्ष कार्यालय सील केली.त्यानंतर सातत्याने या ठिकाणी येत आहे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक महापालिका कार्यालयाबाहेर ठराविक दिवस ठरवून येत होते.
त्याच दरम्यान निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाले. त्यानंतर शिंदे गटाचे काही आमदारांनी विधीमंडळात दाखल होऊन विधानभवनातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा घेतले. त्यामुळे पालिका मुख्यालय बाहेर पोलिसांनी देखील महापालिकेजवळ फौजफाटा वाढविला आणि खबरदारी म्हणून विशाखा राऊत, स्नेहल आंबेकर, सुजाता सानप, संजय अगलदरे यांच्या सोबत अनेक नगरसेवक व विभाग प्रमुख येथे दाखल झाले.
[read_also content=”आता साहिल उघड करणार सत्य? निक्कीशी लग्न लावणाऱ्या ब्राम्हणाला पोलिस कोठडीत करावा लागणार सवाल-जवाबाचा सामना https://www.navarashtra.com/crime/nikki-yadav-murder-case-update-sahil-gehlot-will-be-made-face-to-face-with-pandit-who-process-the-vidhis-of-merriage-nrvb-370990.html”]
मात्र आम्ही रोजच्या प्रमाणे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी नागरिक महापालिका कार्यालयाबाहेर बसण्यासाठी आल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र येथे आल्यानंतर पोलिसांचा ताफा दिसल्याने या गटाने विचारपूस केली असता शिंदे गटाचे नगरसेवक येणार असल्याचे समजल्याने या नगरसेवकांकडून सांगण्यात आले.
पालिका आयुक्तांना आधीच पक्ष कार्यालयाबाबतचे निवेदन आम्ही दिले आहे. मात्र त्यांना पुन्हा एकदा निवेदन देऊन आम्ही याबाबतची माहिती देणार आहोत. आम्ही ओरिजनल बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आमच्या रक्तात शिवसेनेचे रक्त भिनलेले आहे. आमच्या नादी लागणाऱ्यांच्या कानाखाली वाजविण्याचे आम्ही विसरलेलो नाही. आणि आम्ही हातात बांगड्या देखील भरलेल्या नाहीत असे माजी नगरसेविका विशाखा राऊत यांनी सांगितले.
महापालिका ही खासगी प्रॉपर्टी नाही आमचे ८० नगरसेवक आहोत आणि त्यांची संख्या केवळ सात ते आठ आहे. महापालिका आयुक्तांकडून सध्या सर्व पक्ष कार्यालयाला सील ठोकण्यात आले असले तरी जर शिंदे गटाला पक्ष कार्यालय देणार असतील तर हे मोठे पक्ष कार्यालय आमचे असून त्यावर अधिकार देखील आमचा असल्याचे राऊत यांच्याकडून सांगण्यात आले.
[read_also content=”आईकडे मागितला होता मुलीचा हात, नकार दिला तर केला कोयत्याने हल्ला, रायपूरच्या रस्त्यावर रंगला रक्तरंजित खेळाचा थरार; वाचाच https://www.navarashtra.com/crime/shocking-crime-raipur-chhattisgarh-viral-video-attack-on-girl-by-sickle-accused-dragged-blood-soaked-girl-on-road-read-the-story-here-nrvb-370757.html”]
आमदार गेले असतील खासदार गेले असतील तरी नागरिक उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे त्यामुळे चिन्ह गेले असले तरी आमचे गटनेते आणि चिन्ह घरोघरी पोहोचवण्यासाठी सक्षम आहे त्यामुळे न्यायालयातून काही निर्णय झाला तरी जनता आमच्या पाठीशी असल्याची भावना राऊत यांनी व्यक्त केली.
७ मार्चला महापालिका विसर्जित झाली आणि ८ मार्च ला पक्ष कार्यालये बंद करणे गरजेचे होते. मात्र पक्षांच्या विनंतीनुसार ही पक्ष कार्यालये सुरू ठेवण्यात आली. शिंदे-ठाकरे वादानंतर पक्ष कार्यालये सील करण्यात आली. मात्र एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या नाव शिवसेना आणि चिन्ह धनुष्यबाण यामुळे पक्ष कार्यालय शिंदे यांना मिळणार असल्याचे चर्चा रंगू लागल्या यापूर्वी अनेकदा सर्व पक्षांकडून विनंती करून देखील पक्ष कार्यालयाचे सील काढण्यात आले नव्हते मात्र आता चिन्हाचा पक्षाचा नावाचा निर्णय झाला असल्याने महापालिका आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष लागून राहिले, नगरसेवक पद अस्तित्वात नसल्यामुळे पक्ष कार्यालय उघडण्याचा प्रश्नच नसल्याचे काही वरिष्ठ अधिकारी सांगतात. काही अधिकारी असे सांगतात की, आता नगरसेवक पदच अस्तित्वात नसल्याने नियमाप्रमाणे कार्यालय उघडण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही.
[read_also content=”‘काली’ पोस्टर वाद: लीना मणिमेकलाईच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; वाचा न्यायालयाने काय म्हटलंय https://www.navarashtra.com/india/kaali-poster-controversy-sc-upholds-stay-on-arrest-of-leena-manimekalai-read-details-here-nrvb-370945.html”]
सोमवारी शिंदे गटाकडून पक्ष कार्यालय ताब्यात घेण्याची शक्यता लक्षात घेत उद्धव ठाकरे गट दिवसभर महापालिका पक्ष कार्यालयाबाहेर ठाण मांडून बसले होते. मात्र संध्याकाळ पर्यंत शिंदे गटाचा कोणताही कार्यकर्ता या ठिकाणी आजची वेळ उद्यावर गेल्याचे दिसते.
एकनाथ शिंदे पक्षाचे नाव व चिन्ह मिळाल्याने मुख्यमंत्र्यांकडून दबाव निर्माण केला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे मात्र असे झाल्यास दोन्ही गटात मोठ्या राड्याची स्थिती निर्माण होऊ शकते