
Assembly Election 2025
यावेळी बोलताना राजन नाईक यांनी सांगितले की, दोन्ही पक्षात युतीसंबधी प्राथमिक चर्चा आज झाली आणि युतीवर शिकामोर्तब करण्यात आले. शिवसेनेचे संपर्क नेते रवींद्र फाटक यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंद यांच्या सांगण्यानुसार युती आकाराला आली आहे. जागा वाटपाची अंतिम बोलणी २० तारीखपर्यंत होतील असे सांगितले.
दरम्यान, या बैठकीला अजित पवार गटाचे नेते उपस्थित नव्हते. तसेच रवींद्र फाटक यांनी देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे या दोनच नेत्यांची नावे घेतल्याने राज्यातील युतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा व सेना अशी महायुतीमध्ये दिसणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले कि, आजच्या युतीच्या मिटिंगबाबत मला कोणतेही माहिती नाही. त्यामुळे वसई विरारमध्ये महायुतीतील सेना भाजपा एकत्र लढत असलेला राष्ट्रवादी मात्र (अजित पवार) वेगळे लढत असल्याचे संकेत निवडणुकीपूर्वीच मिळत आहेत.
वसईत तब्बल साडेपाच वर्षांनंतर होणाऱ्या महापालिकेच्या तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पाड पाडण्यासाठी प्रशासनाकडून १ हजार ४०० मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून मतमोजणी एकाच ठिकाणी महापालिका मुख्यालयात होणार आहे. महापालिकेच्या २९ प्रभागातून ११५ नगरसेवक निवडले जाणार आहेत. तर यानिवडणुकीत ११ लाख २७ हजार ६३७मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. वसई विरार महापालिका क्षेत्रात एकूण २९ प्रभाग असून २८ प्रभागांतून प्रत्येकी चार, तर २९व्या प्रभागातून तीन नगरसेवक निवडले जाणार आहेत. सोमवारी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार, ६ लाख १ हजार ७४१ पुरुष, ५ लाख २५ हजार ७५० महिला आणि १४६ इतर मतदार आहेत. हेच मतदार प्रभागातील प्रतिनिधींचे भवितव्य ठरवणार आहेत.