Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘निवडून आल्यास कोणाला पाठिंबा देणार’? बापूसाहेब भेगडेंनी भूमिका स्पष्ट करावी, कार्यकर्त्यांची मागणी

मावळमध्ये मदार शेळके यांना वैयक्तिक मानणारा मोठा वर्ग आहे. पाच वर्षात केलेले विकासकामे व लोकांशी सातत्याने ठेवलेला संपर्क ही त्यांची मोठी बलस्थाने आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद त्यांच्या पाठीशी आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 01, 2024 | 02:35 AM
‘निवडून आल्यास कोणाला पाठिंबा देणार’? बापूसाहेब भेगडेंनी भूमिका स्पष्ट करावी, कार्यकर्त्यांची मागणी
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी: अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना मत देण्याबाबत भाजपा बरोबरच महाविकास आघाडीचे मतदार द्विधा मनस्थितीत असल्याने ‘मावळ पॅटर्न’च्या नावाखाली निर्माण करण्यात आलेल्या फुग्यातील हवा निघून जाण्याच्या मार्गावर आहे. निवडून आल्यास सरकार बनवण्यासाठी कोणाला पाठिंबा देणार, हे बापूसाहेब भेगडे यांनी आधी जाहीर करावे, अशी मागणी तालुक्यातील काँग्रेस व शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते करीत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस मधील अजित पवार यांचे समर्थक असलेल्या बापूसाहेब भेगडे यांना अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरवून त्यांच्यामागे सर्व शेळके विरोधकांची एकत्रित ताकद उभी करण्याचा प्रयत्न स्वतःला तालुक्यातील ‘भाजपचे चाणक्य’ म्हणवून घेणाऱ्या नेत्याने चालवला आहे. भाजप व महाविकास आघाडीचे नेते बापूसाहेबांच्या व्यासपीठावर एकत्र आल्याचे चित्र दिसत असले तर बापूसाहेबांना मत म्हणजे नेमके कोणाला मत, हा प्रश्न भाजप बरोबरच महाविकास आघाडीच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना सतावत आहे.

बापूसाहेब भेगडे यांना भाजपचे नेते मदत करीत असल्यामुळे निवडून आल्यानंतर बापूसाहेब भाजपलाच पाठिंबा देतील, असे भाजपच्या निष्ठावान मतदारांना सांगण्यात येत असल्यामुळे महा विकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेस व शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सावध पावित्रा  घेतला आहे. बापूसाहेब भेगडे यांनी त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट केल्याशिवाय प्रचारात सक्रिय होणार नाही, असे बजावल्यामुळे बापूसाहेब भेगडे अडचणीत आले आहेत.

बापूसाहेब भेगडे हे दोन्ही दगडांवर पाय ठेवून स्वार्थाचे राजकारण करणार असतील, तर त्यांचे काम आम्ही का करायचे, असा प्रश्न काँग्रेस व शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते करीत आहेत. बापूसाहेब भेगडे यांच्या व्यासपीठावर आम्ही उपस्थित राहिलो असलो तरी आमच्या पक्षांनी बापूसाहेब भेगडे यांना अद्यापी अधिकृत पाठिंबा जाहीर केलेला नाही. त्यामुळे बापूसाहेब भेगडे यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा गृहीत धरू नये, असा इशारा काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

हेही वाचा: बापूसाहेब भेगडे यांचं जोरदार शक्तिप्रदर्शन; मावळमधून अपक्ष उमेदवारी अर्ज केला दाखल

महाविकास आघाडीचा पाठिंबा घेऊन अपक्ष म्हणून निवडून येऊन महायुतीला सरकार स्थापनेसाठी मदत करणार असतील, तर आम्ही बापूसाहेब भेगडे यांचे काम करणार नाही, असे काँग्रेस व शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आता उघडपणे बोलू लागले आहेत. या सर्व राजकीय घडामोडींमुळे ‘सर्वपक्षीय’ उमेदवार म्हणून स्वतःला मतदारांपुढे प्रोजेक्ट करण्याचा बापूसाहेब भेगडे यांचा डाव त्यांच्याच अंगाशी आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मावळ तालुक्यात आमदार शेळके यांना वैयक्तिक मानणारा मोठा वर्ग आहे. गेल्या पाच वर्षात  केलेले विकासकामे व लोकांशी सातत्याने ठेवलेला संपर्क ही त्यांची सर्वात मोठी बलस्थाने आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची पूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी आहे. पक्षनिष्ठ असणारे भाजप व महायुतीचे नेते व कार्यकर्ते शेळके यांच्याच पाठीशी आहेत. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनीही महायुती धर्माचे पालन करण्याचे आदेश त्यांच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यामुळे आमदार शेळके यांना आव्हान देणे सोपे नाही, हे विरोधकांनाही मान्य करावे लागते. भाजपचे नेते ‌देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याशी थेट वाईटपणा घेणे राजकीय भवितव्याच्या दृष्टीने अडचणीचे ठरू शकते, या धास्तीने महायुतीचे काही नेते अस्वस्थ आहेत. ते बापूसाहेबांच्या व्यासपीठावर दिसत असले तरी प्रत्यक्षात सक्रिय झाल्याचे दिसून येत नाही.

बापूसाहेब भेगडे यांनी त्यांची पुढील राजकीय भूमिका स्पष्ट केली तरच आम्ही त्यांना मतदान करू, असे ठाम भूमिका भाजप बरोबरच महाविकास आघाडीच्या  निष्ठावान मतदारांनी घेतली आहे. गेल्या पाच वर्षात मावळचा विकास झाला नाही आणि केवळ व्यक्ती द्वेष हे दोन मुद्दे बापूसाहेबांना मत देण्यासाठी पुरेसे नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे. बापूसाहेब भेगडे व त्यांच्या मागे असलेले ‘चाणक्य’ द्विधा मनस्थितीत असलेल्या कार्यकर्ते व मतदारांचे शंका निरसन कशाप्रकारे करणार, या विषयी तालुक्यात उत्सुकता आहे.

Web Title: Shivsena thakceray faction and congress members demand bapusaheb bhegde should explain his role for maval

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2024 | 02:35 AM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?
1

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.