Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘लेटलतीफ’ कर्मचाऱ्यांना डेप्युटी सीईओंचा दणका; तब्बल 56 जणांना ‘कारणे दाखवा’, अनेकांचे धाबे दणाणले

पाच दिवसांचा आठवडा लागू केल्यापासून शासनाने शासकीय कार्यालयात येण्यासाठीची वेळ सकाळी 9.45 वाजता आहे आणि घरी जाण्यासाठीची वेळ सायंकाळी 6.15 वाजताची आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 23, 2024 | 01:32 PM
'लेटलतीफ' कर्मचाऱ्यांना डेप्युटी सीईओंचा दणका

'लेटलतीफ' कर्मचाऱ्यांना डेप्युटी सीईओंचा दणका

Follow Us
Close
Follow Us:

अमरावती : कार्यालयात येण्या-जाण्याची वेळ निश्चित करून दिलेली असताना याला फाटा देत सोमवारी (दि.21) जिल्हा परिषद कार्यालयात उशिरा येणारे 56 लेटलतीफ कर्मचारी पकडण्यात आले. या सर्व लेटलतीफ कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा यांच्या मार्गदर्शनात सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालासाहेब बायस यांनी ही कारवाई केली.

शासकीय कार्यालयात कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनाने कार्यालयात येण्या-जाण्यासाठीची वेळ निश्चित करून दिलेली आहे. पाच दिवसांचा आठवडा लागू केल्यापासून शासनाने शासकीय कार्यालयात येण्यासाठीची वेळ सकाळी 9.45 वाजता आहे आणि घरी जाण्यासाठीची वेळ सायंकाळी 6.15 वाजताची आहे. असे असताना सोमवारी जिल्हा परिषद मुख्यालयातील विविध विभागांत कार्यरत असलेल्या 56 कर्मचाऱ्यांनी शासकीय कार्यालयात येण्याच्या 9.45 वाजेच्या गाठले.

दरम्यान, सीईओंच्या मार्गदर्शनात सामान्य प्रशासन विभागाचे डेप्युटी सीईओ बायस यांनी विविध विभागांत कार्यरत असलेले हजेरी रजिस्टर आपल्या ताब्यात घेतले. या हजेरी रजिस्टरची तपासणी केली असता यामध्ये जिल्हा परिषद मुख्यालयातील विभागांमधील 56 कर्मचारी लेटलतीफ असल्याचे आढळून आले.

कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ

डेप्युटी सीईओंनी विविध विभागांतील कर्मचाऱ्यांचे सकाळी 10 वाजता हजेरी रजिस्टर ताब्यात घेतल्याची चर्चा पसरताच लेटलतीफ कर्मचाऱ्यामध्ये एकच खळबळ उडाली. दरम्यान, लेटलतीफ आढळून आलेल्या 56 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे डेप्युटी सीईओ बालासाहेब बायस यांनी दिली.

विभागनिहाय लेटलतीफ कर्मचारी संख्या वाढली

आरोग्य विभाग 9. ग्रामीण पाणीपुरवठा 5. नरेगा 1. वित्त विभाग पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग 5. बांधकाम विभाग 8. बांधकाम उपविभाग क्र.२ मध्ये 7, पशुसंवर्धन विभाग 3, सिंचन विभाग 2. जलसंधारण उपविभाग 3. समाजकल्याण विभाग 4 अशा प्रकाराने 11 विभागांत 56 कर्मचारी लेटलतीफ आढळून आले.

Web Title: Show cause notice to 56 late employee in amravati nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2024 | 01:32 PM

Topics:  

  • Amravati News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.